ही पतसंस्था आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी नवा मार्ग दाखवेल - ना. मकरंद पाटील
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
लोणंद शहरांमध्ये श्री काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था लोणंद या पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा मा. आ. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते रविवार दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाला.
या नव्या संस्थेतून आपल्या समाजाला आर्थिक सहाय्य सहकार्य व विकासासाठी मोठा स्त्रोत मिळणार आहे. आपल्या सहकार्याने पतसंस्था आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी नवा मार्ग दाखवेल असा विश्वास मकरंद पाटील यांनी व्यक्त केला
यावेळी प्रमुख पाहुणे मिलिंद पाटील, आनंदराव शेळके पाटील नितीन भरगुडे पाटील, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील, दत्तानाना ढमाळ, से.नि.अप्पर पोलिस अधिक्षक राजेंद्र शेळके पाटील, निरा येथील समता पतसंस्थेचे चेअरमन दिलीप दादा फरांदे, मनोज पवार, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खंडाळा सौ .प्रिती काळे, वाईचे सहाय्यक निंबधक अनिल रामदास क्षीरसागर नगराध्यक्षा सौ. मधुमती गालिंदे इ. प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .
पतसंस्थेचे संस्थापक संचालक संदिप भालचंद्र शेळके पाटील, चेअरमन राहुल शेळके पाटील व्हाईस चेअरमन सौ.विद्या अनिल क्षीरसागर डाँ.किशोर बुटीयानी शशिकांत जाधव हेमंत निंबाळकर राहूल शहा आकाश शेळके रविंद्र धायगुडे सारीका धायगुडे, आशा सूर्यवंशी इ. संचालक सचिव सौ. प्रतिभा राहुल शेळके ज्येष्ठ पत्रकार बाळ लोणंदकर उपस्थित होते. सुत्रसंचालन शशिकांत जाधव अँड गजेंद्र मुसळे यांनी केले आभार प्रदर्शन संदिप शेळके यांनी मानले. कार्यक्रमास लोणंद शहर व परिसरातील शेतकरी नागरीक महिला व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा