सद्‌गुरू नारायण महाराजांनी केलेले अलौकिक कार्य अद्यात्मातील मर्म आहे - जेष्ठ नेते बाळासाहेब सोळस्कर

आचार्य भृगुऋषी मठात लोकसंत सद्‌गुरू नारायण महाराज मासिक स्मृती व्याख्यान माला

Acharya bhrugu rushi ashram, bhuinj, sadguru narayan maharaj, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

श्री. क्षेत्र नारायणपूर व सद्‌गुरू नारायण महाराजांनी सातारा जिल्हयासह संपूर्ण देशभरात केलेले अलौकिक कार्य हे माणूस घडवणारे लोककार्य असून त्यांच्या विचाराने जात राहिल्यास खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या जीवनात सुख समाधान अनुभवायला मिळेल हेच खरे अद्यात्मातील मर्म आहे असे प्रतिपादन जेष्ठ नेते बाळासाहेब सोळस्कर यांनी केले.

श्री क्षेत्र भुईज येथे आचार्य भृगुऋषी मठात लोकसंत सद्‌गुरू नारायण महाराज मासिक स्मृती व्याख्यान मालेच्या बाराव्या व्याख्यान व समारोप प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ नेते बाळासाहेब सोळस्कर  बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार मदन  भोसले होते. तर प्रमुख उपस्थिती श्री क्षेत्र नारायणपूर संस्थानचे उत्तराधिकारी टेंबे स्वामी महाराज, व्यवस्थापक भरतानाना क्षीरसागर, उद्योगपती रामभाऊ वारागडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळासाहेब सोळस्कर  पुढे म्हणाले की, लोकसंत सद‌गुरू नारायण महाराजांनी गंडे दोरे न देता सदविचारांची व चांगल्या आचरणाची पेरणी केली. त्यामुळे आज चार दशकांच्या प्रवासानंतर भुईज, सोळशी, बामणोली विनायकनगर ही तिर्थक्षेत्र घडवण्यात आपणास यश मिळाले. समाजातील व्यसनाधिनता, दुरावलेले कौटुंबिक संबंध यांच्यावर संस्कार करत कुंटुबे सुरळीत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या आचार आणि विचारातून यापुढच्या पिढया घडाव्यात एवढे मोठे अलौकिक कार्य केले आहे. त्यांच्या विचाराने यापुढे जावू या असे आवाहन करून त्यांनी सद्‌गुरूंचे अनेक दाखले दिले.

तर अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार मदनदादा भोसले पुढे म्हणाले की सद्‌गुरू आण्णा महाराजांनी आपणास वेळोवेळी दिलेले दाखले व कृतीतून उभारलेले आदर्श जपूया तिर्थक्षेत्र भुईज व आचार्य भुंगऋषी  मठाचे पावित्र्य वाढवूया असे हि ते म्हणाले.

प्रारंभी श्री क्षेत्र नारायणपूर संस्थानचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांनी अनेक प्रासगिक उदाहरणे देत विचारांचा जागर केला तर उत्तमधिकारी टेंबे स्वामी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत संदेश दिला. कार्यक्रमास राज्यभरातील शिष्यगण विविध पक्षांचे व संस्थानचे पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने हजर होते.

स्वागत सरपंच विजय वेळे उपसरपंच शुभम पवार आदींनी केले प्रास्ताविक जेष्ठ नागरिक संघाचे प्रा. विठ्ठलराव जाधवराव यांनी केले तर आभार संजय शिंदे यांनी मानले सुत्र संचालन पत्रकार जयवंत पिसाळ यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तसेवेकरी मंडळ, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट, प्रेस क्लब, जेष्ठ नागरिक संघ, सदगुरु आण्णांच्या लेकी ग्रुप व ग्रामस्थ भुईज यांनी परिश्रम घेतले.

---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !