अपघात ग्रस्त दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा पुणे महामार्गावर जोशिविहीर येथील उड्डाण पुलावर दुचाकी दुभाजकाला घसरून फरकटत गेल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अविनाश अशोक शेडगे वय 30 वर्षे रा . हणबरवाडी. ता कराड जि.सातारा असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधवार दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जोशिविहीरच्या पुलावर दुचाकीवरून क्र एम एच- ५० जे ६७६४ निघालेले अविनाश शेडगे यांना वाहनांचा अंदाज न आल्याने दुचाकीचा ताबा सुटल्याने दुचाकी मधल्या दुभाजाकाला धडकून फरफटत गेली.
त्यावेळी दुचाकी बरोबर अविनाश शेडगे हे देखील फरफटत गेल्याने त्याच्या नाकाला व डोक्याला गंभीर मार लागल्याने जखमी झाले होते. त्यांना महेश उत्तम बोराटे यांनी पाचवड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते . तेथील वैद्यकीय सूत्रांनी तो मयत झाल्याचे सांगितले. सदर अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार शिवाजी जाधव करीत आहेत.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














