नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी - वनविभागातर्फे सतर्क राहण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई तालुक्यात पश्चिम भागातील गाढवेवाडी गावात बिबट्याची प्रचड दहशत गेल्या पंधरा दिवसापासुन बिबट्याचा शिवारात डोंगरात वावर असुन गावातील 4 शेळ्या तीन कुत्री लहान गायीची वासरे मारून फस्त केली आहेत त्यामुळे गावातील नागरिक जीवमुठीत धरून राहात आहेत लोकाचे जनावराचे आर्थिक नुकसान होत आहे.
दुपारच्या सुमारास चरावयास गेलेल्या शेंळ्या वर हल्ला केल्याने तसेच गावातील ग्रामस्थांशी संवाद साधुन बिबट प्राण्याबाबत योग्य माहीती देवुन खबरदारी व नागरिकांनी स्वतःची काळजी सतर्क राहण्याबाबत आवाहन वनविभागाने केले आहे.
बिबट्या डोळ्या देखत शिकार करत आहे याकडे प्रशासन वन अधिकारी याच्याकडे तक्रार देऊन कारवाई होत नाही याचा वेळी बदोबस्त केला नाही तर जीवित हानी होऊ शकते तरी वनविभागाने दखल घेऊन उपाय योजना करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी शिवसेना वाई तालुका प्रमुख रवींद्र भिलारे यांनी केली आहे
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














