मंत्री मकरंद पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या वर्तमानपत्राची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होळी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
कुसगाव खडी क्रशर आंदोलकांच्या आडून कुणी मंत्री मकरंद पाटील यांना टार्गेट करत असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्याला जोरदार विरोध करू. यावेळी एका दैनिकात नामदार मकरंद पाटील यांच्यावर तत्याहीन टीका केल्याबद्दल सदरच्या दैनिकाची होळी करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. या बैठकीस पश्चिम भागातील कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
नामदार मकरंद पाटील यांचे आज वाई तालुक्यांमध्ये सर्वात जास्त प्रेम असेल तर पश्चिम भागावरती आहे. आज पश्चिम भागाचा सर्वांगीण त्यांनी खऱ्या अर्थाने विकास केला. त्याचबरोबर अतिवृष्टी असेल कोविड काळात देखील सर्वांना मोठ्या भावाप्रमाणे मदतीचा हात दिला. पश्चिम भागातील कुसगाव गावातील क्रेशर विरुद्ध जे आंदोलन सुरू आहे त्यांना देखील खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आपल्याच पश्चिम भागातील ग्रामस्थ म्हणून स्वतःच्या निवासस्थानी कमीत कमी दोन ते तीन वेळा संवाद साधला व प्रशासनाला देखील सांगितले.
तसेच गावात देखील क्रेशरचा वाद मिटावा म्हणून स्वतः गेले होते.पायी मोर्चामध्ये देखील राहण्याची व जेवणाची मदत केली. क्रेशरचा वाद मिटेपर्यंत क्रेशर वरती तात्पुरती स्थगिती आणली होती. याचा स्वतः मी साक्षीदार आहे. आणि आज राजकीय विरोधकांचे ऐकून नामदार मकरंद पाटील यांच्या विरोधात बोलून आपल्या पश्चिम भागाचे नाव खराब करू नका ही विनंती. ते आज महाराष्ट्राचे नेतृत्व पूर्ण जबाबदारीने करीत आहेत.याचा आम्हाला अभिमान आहे. नामदार मकरंद पाटील यांच्यावर जर कोणी चुकीचे बोलले तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. जशास तसे आम्ही उत्तर देऊ असे राष्ट्रवादीचे विक्रांत डोंगरे यांनी सांगितले आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा