आरोपींना अटक करावी यासाठी पोलिसांना राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर शहरातील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेत 27 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून हा भ्रष्टाचार करणारे संस्थेचे अध्यक्ष व त्यांचे नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल होऊन वर्ष उलटले तरी अटक झाली नसून या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी ठेवीदार महिला व पुरुषांनी आज शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना राखी बांधून आगळे वेगळे अनोखे रक्षाबंधन केले आहे. यावेळी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात आनंद आगरी सहकारी पतसंस्थेची ठेवीदारसुभाष जैन, सतिश छाजेड, रामदास सरड, ललित सुराणा, योगिता लोढा, सचिन लोढा, फईम सय्यद,देवल शाह, निलेश मुथा, मंगल बाफना, निर्मला चाबुकस्वार, श्रीकांत चाबुकस्वार, राजेंद्र दुगड, रामभाऊ सरोदे, योगेश चंडालिया, रवी पुजारी, लता जाधव, वर्षा सुराणा, वीर बाई, विद्याधर कुलकर्णी, रत्नमाला फिरोदिया महिला पुरुष तसेच वृद्ध ठेवीदार महिला गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या महिला यावेळी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल व ठेवीदारांना दिलासा मिळेल असे सांगितले. तर बारा ऑगस्ट पासून होणारे ठेवीदारांचे उपोषण पोलिसांनी विनंती केल्यामुळे स्थगित करण्यात आले असल्याची ठेवीदारांनी सांगितले.
शिरूर येथील आनंद नागरी पतसंस्थेत भ्रष्टाचार होऊन 27 कोटी रुपयांचा अपार संस्थेचे अध्यक्ष अभय चोरडिया व त्यांचे नातेवाईक व इतर यांनी केला आहे. या संदर्भात दिनांक ९ जुलै २०२४ रोजी शिरूर पोलीस स्टेशन येथे चोरडिया कुटुंबातील ९ आणि अन्य ५ जणांविरुद्ध एफ आय आर दाखल झाली. त्याला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. ९ ऑगस्ट २०२५ रोजी १३ वा महिना पूर्ण होत आहे. परंतु पोलिसांना अद्याप अटकपूर्व जामीन ज्यांना नाकारला, त्या अभय व प्रविण चोरडिया या आरोपींना अटक करण्यात यश आले नाही.
आपण आत्तापर्यंत अनेक वेळा पोलीस स्टेशनवर ठेवीदारांनी चकरा मारल्या आहेत विनंती केल्या आहेत पोलिसांनीही आपल्याला ठोस आश्वासन दिलेले होते पण ते तोंडी होते. पोलिसांनी आपली पोथी ओळखली आहे. त्यांचा भ्रम असेल की ठेवीदार विखुरलेले आहेत. त्यांचा हा भ्रम खोटा असल्याचे त्यांना दाखवून देण्यासाठी रक्षाबंधनाचा सण दिवशी पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करून आपल्या ठेवींचे रक्षण करावे यासाठी रक्षाबंधन या सणाच्या दिवशी आपण सर्व महिला व पुरुष ठेवीदारांनी पोलीस स्टेशन शिरूर येथील पोलिसांना राखी बांधण्याचे अनोखे अभिनव आंदोलन केले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा