मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (प्रतिनिधी पारस मुथा)
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमात पाच अत्याधुनिक मोबाइल सर्व्हिलन्स व्हॅनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या व्हॅनमुळे पोलिस दलाच्या कार्यक्षमतेत मोठी भर पडणार आहे.
या व्हॅनमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, वायरलेस कम्युनिकेशन सिस्टिम्स आणि इतर निगराणी यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची तत्काळ प्रतिक्रिया शक्य होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार माधुरीताई मिसाळ, आणि आमदार चेतन टिळेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि अन्य मान्यवरही सहभागी झाले होते.
या उपक्रमामुळे पुणे शहरातील सुरक्षा व्यवस्थेत आणखी मजबुती येणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














