आंदोलकांनी लिहिले स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
आजच्या आधुनिक युगामध्ये आपल्या हक्कांसाठी मागच्या २२ दिवसांपासून जवळपास २५० किमी चालत कुसगाव एकसर व्याहळी या तीन गावातील ग्रामस्थ आपल्या निसर्गरम्य व जैविक विविधतेने नटलेल्या आपल्या गावाला एका बेकायदेशीर दगडखाण व क्रशर पासून वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत आहेत. बेकायदेशीर क्रशर विरोधात काढण्यात आलेल्या या लॉंग मार्च आंदोलनाविरोधात आज लोकशाहीचा गळा घोटत सातारा जिल्हा प्रशासनाने निकाल दिला.
या निकालात आंदोलनकर्त्यांनी तांत्रिकदृष्ट्या व कागदी पुराव्यानुसार उपस्थित केलेले सर्व मुद्दे जिल्हा प्रशासनाने खोडत लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप आज या तीन गावातील आंदोलनकर्त्यांनी केला.
आंदोलनाच्या १९व्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट करून देतो म्हणून पोलीस प्रशासनाने दिशाभूल करण्याचे काम केले याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अश्रू येईल अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात आले. आपल्या शरीरातील रक्ताचा एक एक थेंब एकत्र करत या आंदोलनकर्त्यांनी देवा भाऊंना याच रक्तातून लिहिण्यात आलेल्या पत्रातून न्याय मिळावे अशी मागणी करत भावनिक साद घातली.
खोटे ग्रामपंचायत दाखले त्या ठिकाणी रस्ता नसल्याचे सर्व पुरावे शेजारी ओढे बंधारे असल्याचे पुरावे त्याचबरोबर दगड खाणीचा गट हा फॉरेस्ट ला लागून असल्याचे सर्व पुरावे संपूर्ण गाव बफर झोन मध्ये असल्याचे पुरावे देऊन देखील. निव्वळ दबावाखाली व लोकशाहीचा गळा घोटत आज जिल्हा प्रशासनाने हा निकाल या तीन गावांविरोधात दिला हा निकाल या तीन गावांविरोधात नसून हा निकाल वाईच्या पश्चिम भागाच्या निसर्ग संपत्ती विरोधात दिल्याची भावना आज संपूर्ण वाई मधील प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात तयार झाली आहे. येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र करून जलसमाधी किंवा सामूहिक आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
निसर्गप्रेमींना आवाहन
एका बाजूने वाईच्या पश्चिम भागाला भूस्खलन सदृश्य भाग म्हणून महाराष्ट्र शासनासमोर मोठ्या निधीची मागणी जिल्हा प्रशासन करते. आणि दुसऱ्या बाजूने बफर झोन इको सेन्सिटिव्ह झोन असूनही भूस्खलन सदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या दगड खाणी सारख्या व्यवसायांना प्रोत्साहन देते.
पश्चिम भागातून जिल्हा परिषद पंचायत समिती तिकिटांसाठी लाचारीला ऊत
आंदोलनकर्त्यांनी ना. मकरंद पाटील यांच्या विरोधात दिलेल्या पत्रकामुळे वाईच्या पश्चिम भागातील उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी आज कोणत्यातरी दैनिकाची होळी करत याचा निषेध केला. मात्र हेच उमेदवारीसाठी इच्छुक असणारे मागच्या २२ दिवसांपासून प्रशासनाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांच्या बाजूने कसल्याच स्वरूपाची भूमिका किंबहुना आपल्या स्तरावर आंदोलन करताना दिसले नाहीत. त्यामुळे लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यापेक्षा नेत्यांचे पाय पुसण्यात अनेक जण धन्यता मनात आहेत असे आंदोलनाचे म्हणणे आले.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा