दुर्गम व डोंगराळ भागातील जलवाहतुकीसाठी ७८ लाख ७ हजार २८२ रुपयांचा निधी

मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांना यश 

Water transport facility, minister makrand Patil, wai, Satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

कोयना जलाशयातील दुर्गम व डोंगराळ भागातील जलवाहतुकीसाठी मागील काही काळापासून लॉंच व बार्ज यांच्या देखभाल दुरुस्ती व इंधनावरील खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनाची मागणी प्रलंबित होती. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून विभागाने ७८ लाख ७ हजार २८२ रुपयांचा निधी वितरण करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आली आहे. 

कोयना जलाशयाच्या पाणीसाठ्यामुळे बाधित झालेल्या गावांतील नागरिकांच्या दळणवळण व संपर्कासाठी १९७६-७७ पासून तापोळा (ता. महाबळेश्वर) परिसरात जलवाहतूक सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. हा तराफा केळघर, तर्फ सोळशी, तापोळा व गाढवली दरम्यान छोट्या- मोठ्या वाहनांची पाण्यातून वाहतूक करत असतो. त्यामुळे कोयना जलाशयावरील साताऱ्यातील दुर्गम व डोंगराळ भागात दळणवळणाचा कणा म्हणून तराफा वाहतूक समजली जाते. हा भाग दुर्गम असून, पर्यटक आपली वाहने ताराफ्यातून घेऊन जात असतात. स्थानिक साताऱ्याला जा-ये करण्यासाठी आपली वाहने घेऊन जातात. 

तापोळा येथील जलवाहतुकीसाठी सध्या कार्यरत असलेल्या १२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागामार्फत अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार १२ कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीतील वेतन, भत्ते व मानधन अदा करण्यासाठी ४४ लाख ७ हजार २८२ रुपये व लॉंच बार्जेसच्या देखभाल व दुरुस्ती व इंधनासाठी ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीतील खर्च भागविण्यासाठी ३४ लाख असा एकूण ७८ लाख ७ हजार २८२ रुपयांचा निधी पुणे विभागीय आयुक्तांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.कोयना जलाशयातील जलवाहतूक सुरळीत चालण्यास यामुळे मदत होणार आहे.परिसरातील नागरिकांना दळण वळणासाठी फायदा होणार आहे.

---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !