किकी बारमध्ये सुरू असलेली फ्रेशर्स पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पाडली बंद

अल्पवयीन मुला-मुलींना सरसकट विकली जात होती दारू
Pub freshers party, MMS, Pune police, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पुणे (प्रतिनिधी पारस मुथा)
राजा रावबहादूर मिल्स येथील "किकी" नावाच्या पब मध्ये दिनांक २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून एम आय टी - वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस, व्ही व्हि आय टी या कॉलेज मधील तरुण तरुणींची फ्रेशर्स पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत शेकडो अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री सुरू होती. कुठलेही ओळखपत्र न पाहता तसेच एन्ट्रीचे रेकॉर्ड रजिस्टर न ठेवता अनेक कॉलेजमधील १७-२१ वयोगटातील मुलांना ह्या कीकी पब चालकांनी प्रवेश दिला होता. 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला ही बाब समजल्यावर राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाचे जगदाळे यांना फोन करून सांगितले व त्या विभागाच्या वाघ मॅडम यांच्यासह थेट किकि पब मध्ये मनविसे पदाधिकाऱ्यांनी धडक दिली. त्यावेळी चालू असलेली पार्टी बंद करून पार्टी आयोजक व पब चालक यांच्यावर कडक कारवाई करण्यास प्रशासनास भाग पाडले. रात्री दोन वाजेपर्यंत उत्पादन शुल्क प्रशासन विभाग कारवाई करत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा फ्रेशर्स पार्टी च्या माध्यमातून तरुण तरुणींना व्यसनाधीन करण्याला ठाम विरोध आहे. इथून पुढे जर कुठल्याही पब, रेस्टॉरंट्सने अशी फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आणि अल्पवयीन मुलांना दारू पाजली तर त्या पबची एकही काच शिल्लक ठेवणार नाही. संपूर्ण पब बार फोडून टाकण्यात येईल हा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे.
शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मनविसे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, उप शहर अध्यक्ष विक्रांत भिलारे, परिक्षीत शिरोळे, विभाग अध्यक्ष हेमंत बोळगे, आशुतोष माने, केतन डोंगरे, शहर कार्यकारिणी सदस्य प्रवीण कदम,उपाध्यक्ष अविनाश वाघमारे, विभाग सचिव मयुर शेवाळे इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !