कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
शिवशाही वृत्तसेवा ,भोकरदन (प्रतिनिधी मजहर पठाण)
समाधान व कीर्ती यांचे विवाहास पाच वर्षे झाली होती. दाम्पत्याला दोन वर्षांची स्वामीनी नामक मुलगी व पाच वर्षांचा रुद्र नामक मुलगा अशी दोन लहान अपत्ये आहेत. काही दिवसांपासून दाम्पत्यामध्ये वाद व भांडणे सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कीर्ती काही दिवसांपूर्वी माहेरी वसई, ता.सिल्लोड येथे गेली होती. समाधान अल्हाट याने तिला पाच-सहा दिवसांपूर्वी जबरदस्तीने पारध येथे आणल्याचे समजते.मात्र पत्नीला ठार मारण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच पारध पोलिस ठाण्याचे स.पो.नि.संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने, पो .हे. काँ.प्रकाश सिनकर,शिवाजी भगत, आणि होमगार्ड यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.भोकरदन चे उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ .नितीन कटेकर यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांना तपासा बाबत सूचना दिल्या.रात्री उशिरा पर्यंत पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
.
या दुर्दैवी घटनेमुळे पारध परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, निष्पाप दोन बालकांचे भवितव्य अंधारमय झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा