पतसंस्था सभासदांना १२ टक्के लाभांश तर गणेशोत्सव काळात धार्मिक - सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच यंदा भव्य क्रीडा स्पर्धाचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
अजिंक्य उद्योग समूहाचे नेतृत्व, साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक मा. श्री. जिवाजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा सह. साखर कारखाना सेवकांची पतसंस्था लि, व कामगार 'श्री' गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन व डिस्टलरी मॅनेजर दिनेश चव्हाण तर सेक्रेटरी बशीर संदे, कार्यालय अधीक्षक सयाजी पाटील, प्रोडक्शन मॅनेजर सुरेश धायगुडे, वर्क्स मॅनेजर रणजित पोळ, चिफ अकॉउंटन्ट प्रविण जाधव, सिव्हिल इंजिनियर शिवाजी थोरात, लेबर ऑफिसर ऍड. रणजित चव्हाण, पर्चेस ऑफिसर पांडुरंग पवार, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व गार्डन विभाग प्रमुख प्रविण जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सेक्रेटरी बशीर संदे म्हणाले, स्व. श्रीमंत छ. अभयासिंहराजे भोसले यांनी निर्माण केलेल्या अजिंक्य उद्योग समूह या वटवृक्षाच्या छायेखाली सर्वजन सुखरूप आहोत. संपुर्ण राज्याला विकासाची आणि नवसंकल्पनेची दिशा देणारे आपले नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कल्पक नेतृत्वाखाली अजिंक्य उद्योग समूहातील सर्व संलग्न संस्थांच्या पारदर्शक कारभारामुळे आज ऊस उत्पादक शेतकरी व कामगार वर्ग आनंदी व समाधानी आहे. शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी साखर कारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही सेक्रेटरी बशीर संदे यावेळी केले.
पतसंस्थेचे चेअरमन व डिस्टलरी मॅनेजर दिनेश चव्हाण यांनी संस्थेच्या आर्थिक वर्षांतील कार्याचा मागोवा घेतच सभासदांना यंदा १२ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तर गणेशोत्सवा निमित्त यंदा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच क्रिकेट, बॅडमिंटन व रस्सीखेच अशा भव्य क्रीडा स्पर्धाचे आयोजन आयोजन केल्याची माहिती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व गार्डन विभाग प्रमुख प्रविण जाधव यांनी सांगितले.
पतसंस्थेच्या सभेचे नोटीस वाचन सेक्रेटरी संभाजी पाटील यांनी तर गणेशोत्सव मंडळाचे नोटीस वाचन सेक्रेटरी पांडुरंग कुंभार यांनी केले. कार्यकामाचे प्रस्तविक प्रोडक्शन मॅनेजर सुरेश धायगुडे यांनी तर सूत्रसंचालन विष्णू जाधव यांनी केले. लेबर ऑफिसर ऍड. रणजित चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सभेस पर्यावरण विभाग प्रमुख बी. डी. पोवार, सॅनिटेशन विभाग प्रमुख संजीवन कदम, सरपंच व इंधन विभागप्रमुख कृष्णा कांबळे, स्टोअर विभाग प्रमुख गाडे, केनयार्ड विभाग प्रमुख पांडुरंग कुंभार, कामगार युनियनचे अध्यक्ष श्री. दिलीप शेडगे व पदाधिकारी, माजी कामगार संचालक नितीन भोसले, प्रशासन विभागाच्या सहकारी व पतसंस्थेच्या संचालिका सौ. आरती भंडारे, सौ. रेश्मा काळे, सौ. सुप्रिया देशमुख आदी मान्यवरांसह कामगार बंधू-भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
पतसंस्थेच्या कार्य तत्परतेमुळे कामगार सभासद आनंदले
शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट असो की कामगारांचे वेतन देण्यात कायम आघाडीवर असणारा साखर कारखाना म्हणून अजिंक्यतारा साखर कारखान्याचा राज्यभरात नावलौकिक आहे. अशातच आज पतसंस्थेच्या सभेत चेअरमन दिनेश चव्हाण यांनी यांनी १२ टक्के लाभांशाची घोषणा करताच सभागृहात उपस्थितीत सभासदांच्या मोबाईलवर बॅंकखाती लाभांश जमा झाल्याचा मेसेज आल्याने कामगार सभासदांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा