प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (जिमाका)
उजनी धरणाच्या सांडव्यावरून पूर नियंत्रणासाठी भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ करून दिनांक- २९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता ५१३६९ क्यूसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. सदर विसर्गा मध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे. सकाळी ०६:०० वाजता पंढरपूर येथे भीमा नदी पात्रातून ३५४०६ क्युसेक्स वेगाने पाणी पाहत असून दगडी फुल पाण्याखाली गेला आहे.
नदीपात्रातील मंदिरे देखील पाण्याखाली असून भीमा नदी काठावरील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता स. शि. मुन्नोळी यांनी केले आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














