विठ्ठल भक्त आणि रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सन्मा.सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी कार्यकारी अधिकारी सचिन इथापे साहेब प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत साहेब लेखाधिकारी मुकेश आणेचा यांचे उपस्थितीत आज पैठण येथील भजनसम्राट श्रीकृष्ण गोसावी यांच्या सुमधुर स्वरातूतून शुभारंभ झाला सुरुवातीला सदस्य श्री ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर , श्रीकृष्ण गोसावी,व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत साहेब, लेखाधिकारी मुकेश आणेचा संजय कोकीळ साहेब आणि कलाकार यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
त्यांनी सुरुवातील एकनाथ महाराजांचा गजर आणि वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र जय जय राम कृष्ण हरी ने वातावरण भक्तिमय करत स्वतः संगीतबद्ध केलेल्या या पंढरीचे सुख पाहता डोळा,सगुण चरित्रे, विठ्ठल सावळा पंढरीये उभा ,असा रे सावळीया,अशा सुरेख रचना गात पंढरपूर कला रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला दिनेश डोळे.निवेदन कांचन लकडे-ढवळे, टाळ प्रशांत गोसावी, स्वरसाथ चंद्रशेखर गोसावी आणि ओंकार गोसावी यांनी केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सरांनी केले.यावेळी विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढेही पाच दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सव संगीत महोत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले.संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी कर्मचारी वर्ग अधिक परिश्रम घेत आहेत.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा