मुलांच्या गटात अथर्व पेरणे, तर मुलींच्या गटात ज्ञानेश्वरी हारदे प्रथम
शिवशाही वृत्तसेवा, राहुरी (प्रतिनिधी गोविंद आढाव)
राहुरी कृषी विद्यापीठ येथे नुकत्याच झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत तांदुळवाडी येथील अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. मुलांच्या गटात अथर्व पेरणे याने तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, तर मुलींच्या गटात ज्ञानेश्वरी हारदे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
या उत्कृष्ट कामगिरीमुळे दोन्ही विद्यार्थ्यांची निवड अहिल्यानगर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली असून, शाळा परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्रिन्सिपल मोहिनीराज होन, शिक्षक आनंद वानखेडे, जयश्री देशपांडे, शितल बोरसे, सुवर्णा मोरे, मनीषा शिंदे, मयूर फडतरे, धनश्री खंडागळे, गोरक्षनाथ होन, पुष्पराणी स्वामी, अमोल जाधव, योगेश होन, ईश्वर होन, राजीव जाधव, मीनाक्षी बोरुडे, स्वप्नाली शिरसाठ, भावना माळी, शामा शहाणे, किरण जाधव आदींनी व पालकांनी विजेत्या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा