दरोडेखोर टोळीप्रमुख व साथीदार दोन वर्षासाठी तडीपार जबरी चोरी, दरोडा, चैन स्नॅचिंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्हयामधील फलटण तालुका हद्दीमध्ये सातत्याने मालमत्तेचे गुन्हे करणारे सराईत टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ बाळु सुरेश जाधव वय २४ वर्षे, तसेच टोळी सदस्य निखील उर्फ काळु सुरेश जाधव वय -२५ वर्षे, दोन्ही रा तावडी ता. फलटण, जि. सातारा यांचेवर टोळीने जबरी चोरी, दरोडा, चैन स्नॅचिंग यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी हेमंतकुमार शहा पोलीस निरीक्षक यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा जिल्हा आणि सातारा जिल्हा हद्दीचा लगतचा भाग असलेले पुणे जिल्हयातील बारामती, इंदापुर व पुरंदर तालुका, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग राहुल धस यांनी केली होती.
फलटण शहर पोलीस ठाणे तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाणेमध्ये यातील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर महिलांना, पुरुषांना कोयत्याचा धाक दाखवुन त्यांचेकडील मौल्यवान वस्तु जबरदस्तीने हिसकावुन घेणे यासांरखे मालमत्तेचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनसुध्दा त्यांना आपल्या टोळीने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्या आहेत. त्यांच्या टोळीवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर कायदयाचा वचक राहवा या करीता सर्वसामान्य जनतेतुन त्यांचेवर कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोषी यांच्या समोर टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ बाळु सुरेश जाधव वय २४ वर्षे, तसेच टोळी सदस्य निखील उर्फ काळु सुरेश जाधव वय २५ वर्षे, दोन्ही रा तावडी ता. फलटण, जि. सातारा यांची सुनावणी होवुन त्यांनी सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये संपूर्ण सातारा जिल्हा आणि सातारा जिल्हा हद्दीचा लगतचा भाग असलेले पुणे जिल्हयातील बारामती, इंदापुर व पुरंदर तालुका, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या प्रकरणी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा अरुण देवकर, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाणेचे पो.हवा. बापु धायगुडे, पो.कॉ. जितेंद्र टिके यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा![]()














