"आम्ही शिरूरकर "फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बापू सानप यांचा सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
इंग्रजांच्या शासनापासून ते मोगलांच्या साम्राज्यापर्यंत तर स्वराज्याच्या निर्मितीपासून तर महाराष्ट्राच्या स्वतंत्र स्वायत्ततेसाठी अनेक युद्ध, लढाया, चळवळी ,उपोषणे, आंदोलने, आणीबाणी, राजकीय डावपेच महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक कथा आहे. महाराष्ट्रात थोर महापुरुषांच्या विचाराचा पगडा असणारे अनेक लोक आहेत. एकीकडे समाजामध्ये कधी धर्माच्या नावाने तर कधी जातीपातीच्या राजकारणामुळे काही लोक आज संकुचित भावनेने, द्वेषाने समाज एकमेकाकडे पाहत असताना, महापुरुषांचा विचार व आदर्श टिकवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते आपला वेळ, पैसा व प्रसंगी बलिदान देण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात.
त्याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे शिरूर मधील "आम्ही शिरूरकर "फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र(बापू) देवराव सानप. रवींद्र बापूंच्या याच कार्याची दखल घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सत्कार केला आहे. हा सत्कार भविष्यात समाजाला समता , बंधुभाव, मैत्री व भाईचारा टिकवून ठेवण्यासाठी नक्कीच ऊर्जा देणारा आहे अशी भावना रवींद्र (बापू) सानप यांनी यावेळी व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षापासून शिरूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक असो किंवा या मिरवणुकी दरम्यान शिस्तबद्ध व चोख बंदोबस्त ठेवणारे पोलीस प्रशासन असो त्यांना लागणाऱ्या सुविधा किंवा अडचणी कडे बारकाई लक्ष देऊन त्यांना बंदोबस्ताच्या ठिकाणी फूड पॅकेट ची सुविधा उपलब्ध करून देणे, संवेदनशील किंवा वर्दळीच्या ठिकाणी शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी मदत करणे, मुस्लिम समाजातील पवित्र रमजान सणानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करणे, सामाजिक कामासंदर्भात वेळोवेळी पोलीस व नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणे, आपण सर्व भारताचे नागरिक आहोत ही भावना प्रत्येक समाजाच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करणे असे अनेक विविध समाजहिताचे उपक्रम राबवत असताना पुणे जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याची दखल घेत, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घेतली व पुणे येथे त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी रवींद्र (बापू) सानप , मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद , पत्रकार सतीश धुमाळ यांनी संदीप सिंह गिल यांना पुस्तके भेट दिली.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा