गुणवत्ता पूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
भुईंज पिराचीवाडी आसले, तालुका वाई येथील सुपुत्र व घाटकोपर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सतीश भगवान जाधव यांना गुणवत्ता पूर्वक सेवेसाठी राष्ट्रपतीपदक जाहीर झाले आहे.
मुंबई, अमरावती,नवी मुंबई, ठाणे, विशेष सुरक्षा विभाग यासह विविध ठिकाणी आपल्या कर्तव्य आणि सेवेतून पोलीस दलाला अभिमानाने मान उंचावण्यासाठी केलेल्या विविध कामांची दखल घेत पोलिस दलाकडुन त्यांना सन २०२२ साली महासंचालकांच्या पोलिस पदकाने गौरविण्यात आले होते. आता त्यांच्या कामाची दखल घेत शासनाकडून त्यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
सतीश जाधव यांना हे राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर त्यांचे मूळगावी पिराचीवाडी आसले तालुका वाई येथे ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. लवकरच मित्रपरिवार व आसले ग्रामस्थ त्यांचा भव्य नागरी सत्कार करणार आहेत.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा