वाहतूक नियंत्रक होण्याचे स्वप्नात राहिले अधुरे
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई आगारातील वाहक सुनील काटे वय ५० याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यात निधन झाले. वाई येथील पत्रकार अनिल काटे यांचे ते थोरले बंधू तर ग्रामसेविका निर्मला काटे- थोरवे यांचे पती होत. वाई आगारात त्याची तब्बल तीस वर्ष प्रवासी सेवा झाली होती. मंगळवारी दि १२ ऑगस्ट रोजी सकाळी वाई- स्वारगेट पुणे ही बस घेऊन ते गेले होते. ड्युटी संपवून ते घरी आले जेवण करून झोपले असताना झोपेतच त्याना तीव्र झटका आला व त्यांचे निधन झाले. नुकतीच त्यांनी वाहतूक नियंत्रकाची परीक्षा दिली होती व ते त्यामध्ये उत्तीर्ण झाले होते. वाहतूक नियंत्रक होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. या परिक्षेत ते उत्तीर्ण ही झाले होते. महिना अखेरीस त्याना वाहतूक नियंत्रक म्हणून नियुक्ती ही मिळणार होती. परंतु दुर्दैवाने त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
त्याच्यावर मेणवली स्मशानभूमीत कृष्णातिरी विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. अचानक झालेल्या त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा