उद्याच्या पिढीला प्रेरणा देण्याचं काम शिवप्रेरणा प्रतिष्ठान करेल - शिवाजीराव बाबर
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
उद्याचे उज्वल भविष्य असणारी पिढी सुस्कृत व्हावी व त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देश्याने शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुणवंत विध्यार्थ्याचा सन्मान करून कायमचा आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा गुणवन्त विध्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रेरणा देण्याचे काम करणार आहे, असे प्रतिपादन शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव बाबर यांनी केले.
उडतरे ता वाई येथील बाळासाहेब पवार हायस्कुल मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घेण्यात आलेल्या प्रतिष्ठानच्या वतीने गुणवन्त विध्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षणप्रेमी श्री प्रताप पवार,सरपंच अर्चनाताई पवार, मुख्याध्यापक दादासो बनसोडे, कांतीलाल (तात्या)पवार,दिलीप बाबर,अरविंद शिंगटे,प्रवीन बाबर विजय जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यालयातील विशेष प्रवीण्य मिळविलेले खेळाडू व इतर स्पर्ध्येत यशस्वी झालेल्या एकूण 15 विध्यार्थ्यांना शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
प्रताप पवार म्हणाले, शिवप्रेरणा प्रतिष्ठानमुळे नक्कीच विध्यार्थ्यांना मोलाचा आधार मिळणार असून त्यांचे काम अजून मोठे होईल त्यांच्या सर्व सदस्यांचे मनापासून कौतुक आहे. याप्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रवीन पवार, सचिव विष्णू बाबर, संतोष बाबर, बिपीन पवार, बापू वाघ, प्रशांत गुजर, सर्व शिक्षक स्टाफ, यांच्यासह उडतरे, सर्जापूर,खडकी, विरमाडे,कळंभे गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक दादासाहेब बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार सचिन मोरे यांनी मानले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा