पथविक्रेत्यांच्या हक्कासाठी बहुजन मुक्ती पार्टीचा आंदोलनाचा इशारा

शिरूर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Street seller, municipality, shirur, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)

शिरूर शहरातील हातगाडीधारक, टपरीवाले आणि पथविक्रेते यांच्या हक्कांसाठी बहुजन मुक्ती पार्टी व शिरूर शहर पथविक्रेता समिती यांच्या वतीने आज शिरूर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, 23 जुलै 2025 रोजी नगरपरिषदेने दिलेल्या अन्यायकारक नोटिसा तात्काळ मागे घ्याव्यात. शासन आदेशानुसार शहरात ठिकठिकाणी फेरीवाला झोन निर्माण करून पथविक्रेत्यांना जागा व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच सन 2013 मध्ये नगरपरिषदेकडून 450 टपरीधारकांवर बेकायदेशीर कारवाई करून त्यांना विस्थापित करण्यात आले होते; त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.

पक्षाने स्पष्ट केले की, शहरातील मोठे व्यापारी व गाळेधारकांनी फुटपाथ व रस्त्यांवर केलेली अतिक्रमणे कायम राहतात, मात्र गरीब पथविक्रेत्यांवरच कारवाई केली जाते. एसटी स्टँडसमोरील रस्त्यावर काही हातगाडीधारक आपली गाडी लावतात, त्याच ठिकाणी श्रीमंत लोक आपली महागडी चारचाकी वाहने पार्क करतात, तरीसुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. हे वर्तन अन्यायकारक असून अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या हक्कांवर गदा आणणारे आहे.

याशिवाय, पाबळ फाटा चौकात नगरपरिषद प्रशासनाने विकासयोजनेच्या रस्त्यावरच बेकायदेशीर अतिक्रमण करून स्मारकासाठी कंपाऊंड व चौथरा उभारला आहे. हा अडथळा मुख्याधिकाऱ्यांना दिसत नाही का? असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. मुख्य चौकात नियमांचे उल्लंघन करून बांधलेल्या या स्मारकामुळे रामलिंगकडून येणाऱ्या वाहनांना अक्षरशः ९० अंशाचा वळण घ्यावे लागते, जे अतिशय धोकादायक आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या भयंकर अपघातात एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय कायमस्वरूपी निकामी झाल्याची माहिती देण्यात आली. अभियंते एवढे अज्ञानी आहेत का की त्यांना ही बाब आम्हाला सांगावी लागत आहे, असा टोला निवेदनातून लगावण्यात आला.

बहुजन मुक्ती पार्टीने स्पष्ट इशारा दिला की, जर मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि न्यायालयात दावा दाखल केला जाईल. याची संपूर्ण जबाबदारी शिरूर नगरपरिषद प्रशासनावर राहील.

निवेदन प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे शिरूर शहर संघटक  अशोक गुळादे, शहराध्यक्ष  समाधान लोंढे, तसेच विलास देठे, गुणवंत उबाळे, सुहास भोसले, निलेश साळुंके, भरत सोनवणे, साहेबराव वेताळ, विष्णू वेताळ, मंगेश रोकडे, सदाशिव सातपुते, राजेश वेताळ, तौफिक सय्यद, मनोज ढवळे, अमीर काजी, संतोष चाळणे आणि इतर अनेक पथविक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !