मंत्री मकरंद पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांना कुसगाव, एकसर, विठ्ठलवाडी, पसरणी, व्याहाळीसह पश्चिम भागातील नागरिकांचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
क्रेशर विरोधात वाई ते मुंबई काढण्यात आलेल्या लॉंग मोर्चामध्ये नामदार मकरंद पाटील यांचा काहीही संबंध नसताना काही लोक हेतूपुरस्कार पाटील यांच्या बदनामीचे षडयंत्र करत आहेत.
वास्तविक पाहता नामदार मकरंद पाटील यांची क्रशर बाबत तोडगा करताना भूमिका ही ग्रामस्थांशी सुसंगत राहिली आहे. परंतु काही लोक केवळ राजकीय हेतूने पाटील यांच्यावर टीका करताना दिसत आहेत क्रशरच्या आडून राजकीय हेतूने ना. मकरंद पाटील यांच्यावर केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही असा इशारा कुसगाव, विठ्ठलवाडी, व्याहळी, एकसर आणि पसरणीसह पश्चिम भागातील नागरिक तसेच तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे नागरिकांनी क्रशर संदर्भात मंत्रालयावर लॉंग मार्च काढला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पुणे येथे जाऊन आंदोलकांशी संवाद साधला आणि शासकीय बाबींची पडताळणी करून आंदोलन तूर्तास थांबवण्याचं आवाहन केलं होत. शिष्टमंडळाने पुणे वाकड येथे आंदोलकांची भेट घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाशी चर्चा करून पुढील सात दिवसांत संबंधित क्रेशर बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती आंदोलकांना देण्यात आली. मात्र, आंदोलकांनी आंदोलन थांबवण्यास नकार देत ते सुरूच ठेवले.
पंचायत समिती उपसभापती विक्रांत डोंगरे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी सांगितले की, “पुण्याच्या पुढे एक्सप्रेस वेवर वाहतुकीची वर्दळ असल्याने आंदोलना मुळे वाहने जास्त असल्याकारणाने जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे आंदोलन तूर्तास शंततेत थांबवणं हिताचं आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही आंदोलकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला होता व .”परतु दोन दिवसांपूर्वी ना. मकरंद पाटील यांचे नांव घेत आबानाच टार्गेट केले जात असल्याने मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्यावर टीका केल्यास ती सहन केली जाणार नाही.
पश्चिम भागातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगण्यात आले की, “ नामदार मकरंद पाटील यांचं पश्चिम भागावर विशेष प्रेम दाखवले आहे. पूर्व भागाच्या तुलनेत अधिक निधी पश्चिम भागाला मिळवून दिला आहे. कुसगावसह अनेक गावांमध्ये विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आबांनी उपलब्ध करून दिला आहे.”
कार्यकर्त्यांनी म्हटले की, “आमदार मकरंद पाटील हे पाच वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. आता ते महाराष्ट्राच्या नेतृत्वात आहेत. त्यांच्या तालुक्यातूनच आणि त्यांच्यावर जर खोटे आरोप केले जात असतील, तर ते आम्ही कदापिही सहन करणार नाही. हा राजकीय डाव असून त्यांना बदनाम करण्याचा हे षडयंत्र रचलं जात आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा