पोलीस बांधवांना औक्षण करून राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर येथील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज रोजी रक्षाबंधनानिमित्त शहर पोलीस स्टेशनमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रक्षाबंधनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी यावेळी दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलीस बांधवांना औक्षण करून राखी बांधली आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी लव जिहाद कायदा लवकरात लवकर मंजूर करावा आणि हीच मागणी राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्राद्वारे करण्यात आले. यावेळी पंढरपूर पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार तसेच निर्भया पथक प्रमुख, आदी पोलीस खात्यातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र समरसता प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री रवींद्र साळे ,जिल्हामंत्री शिवाजीराव जाधव आणि जिल्हा सहमंत्री श्री गोपाळ सुरवसे, बजरंग दल गोरक्षक गोपाळ सुगंधी,मातृशक्ती विभाग संयोजिका सौ.भाग्यश्री लिहिणे,सोलापूर विभाग दुर्गावाहिनी प्रमुख प्रगती सतीश नाकुरे, जिल्हा दुर्गावाहिनी सहसंयोजिका पायल परदेशी, माळशिरस प्रखंड सयोजिका प्रणाली माने ,अकलूज प्रखंड संयोजिका युविका कदम, अकलूज प्रखंड सहयोजिका दिव्या काटकर, करमाळा संयोजिका रेश्मा जाधव आदि विहिंपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा