पंढरपूर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
अनघा प्रो ऍक्टिव्ह अबॅकस वैदिक मॅथ्स अँड रोबोटिक सेंटर पंढरपूर आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक तीन ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता भक्ती मार्ग पंढरपूर येथे संचालिका आयोजक सरिता मुढे माने यांच्यावतीने संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आदरणीय आमदार अभिजीत आबा पाटील यांनी उपस्थिती लावली अनघा प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासच्या डायरेक्टर सरिता मुढे यांनी केवळ दहा विद्यार्थ्यांपासून सुरू केलेला प्रवास आज 300 हुन् जास्त विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत.
इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या म्हणी प्रमाणे या सेंटरचे जवळजवळ 190 विद्यार्थी ऑल ऑफ महाराष्ट्र मध्ये टॉपर्स म्हणून आलेले आहेत या सेंटरला सलग पाच वर्ष बेस्ट सेंटर अवॉर्ड व प्रो ऍक्टिव्ह कंपनीकडून दहा हजार रुपयांचा चेक देखील मिळालेला आहे त्याचबरोबर मॅथ्स ऑफ द मॅजिशियन हा पुरस्कार 2024, व 2025 सलग दोन वर्ष मिळालेला आहे शरीराने अपंग असणाऱ्या सरीता मॅडमनी हे दाखवून दिलं आहे की शरीराने अपंग असले तरी मनाने कधीही अपंग राहू नये. . एक स्त्री काय करू शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सरिता मुढे होय. इवल्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष होताना दिसत आहे.
"जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उधारी" या वाक्याला समर्पक कार्य असणाऱ्या आदरणीय , गुरुवर्य सरिता मॅडम जिद्दीने यशस्वीपणे वाटचाल करत आहेत.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांचा विकास ही अकॅडमी करत आहे असे मत आमदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले. खरंतर लोकप्रतिनिधी कसा असावा हे यावेळी आमदार साहेब अभिजीत आबा पाटील यांनी दाखवून दिलं की धाडसी स्पष्टवक्ता आणि आपुलकीचं नातं जपणारा असं ज्यांच्या सहवासात राहून जाणवलं असे आदरणीय आबा. जसं की डॉक्टरांबद्दल बोललं जातं माणसातला देव तसं आदरणीय आबांविषयी लिहायचं झालं तर माणसातला खरा लोकप्रतिनिधी किंवा खरा नेता असं आदरणीय आबासाहेबांना म्हणता येईल.आदरणीय आबा हे एका फोनवरती कार्यक्रमाला उपस्थित राहिले की ज्यांची उपस्थिती आम्हा सर्वांसाठी खूप अनमोल आणि लाख मोलाची ठरली खरंतर आबा हे टोपणनाव त्यांना खूप सूट होतं .आबा या नावाचा तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला आधार वाटतो. आपल्या घरातील एक प्रतिनिधी च आपल्यासाठी मंत्रालयात लढत आहे असं वाटतं. खरंतर आबा न विषयी ऐकलं होतं की एका फोन वरती आपलं काम होतं पण हे आज या कार्यक्रमाच्या वेळी प्रत्यक्षात अनुभवलं.
अनघा प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लास मधील स्कूल प्रोजेक्ट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धेवाडी ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळां नेपतगाव, श्री समर्थ स्कूल तपकीर शेटफळ, शिवतेज प्राथमिक शाळा मंगळवेढा तसेच अनघा प्रो ऍक्टिव्ह अबॅकस पंढरपूर मधील सर्व विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट व एक झाड देऊन गौरवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला झाडाचे संगोपन करण्यास सांगून वृक्षारोपणाचा एक नवा संदेश यावेळी सरिता मॅडम यांच्याकडून देण्यात आला .खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने उपस्थित पालकांमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली . अपंग असून विविध ठिकाणी जाऊन तेथील विद्यार्थ्यांना शिक्षण देणे , होणारी धावपळ प्रवास हे खरच सहजासहजी शक्य होणारी गोष्ट नव्हती पण म्हणतात ना जिद्दीने केलेलं कोणतंही कार्य यशाकडे घेऊन जातं यासाठी केलेले कष्ट आज या विद्यार्थ्यांच्या यशाचे रूपाने मिळाले.
आज माझ्या क्लासमध्ये शिकणारे तीनशे हुन विद्यार्थी आणि पालक हीच माझी खरी श्रीमंती आहे असे उद्गार संचालिका सरिता मुढे मॅडम यांनी काढले. मॅडम यांच्या अनघा अकॅडमीतील विद्यार्थी हवेमध्ये बोट फिरवून दहा अंकी बेरीज वजाबाकी गुणाकार क्षणात करताना व 99 पर्यंतचा कोणताही पाढा एक सेकंदाच्या आत म्हणताना पाहून प्रमुख पाहुण्यांना आश्चर्य वाटले त्याचबरोबर मॅडमचे आणि त्यांच्या हुशार विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आलं. त्याचबरोबर कार्यक्रमाचेनिवेदक म्हणून मॅडमचे बंधुराज सुप्रसिद्ध गायक भारत मुढे यांच्या गायनाने कार्यक्रमास उपस्थित असणारे पालक वर्ग मंत्रमुग्ध झाले.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉक्टर वृषाली पाटील पुणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे ,श्री समर्थ स्कूल तपकीर शेटफळ चे संस्थापक संजय गवळी सर ,प्राचार्य गवळी मॅडम ह भ प शंकर महाराज चव्हाण उपस्थित होते. प्रमुख उपस्थित म्हणून सोमनाथ कदम, क्रांती भालेकर , अजिंक्य गुरव सर, प्रवीण गुंड सर ,अमोल खिलारे सर, शुभांगी बनसोडे ,आशा पाटील, दिपाली शिंदे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमानिमित्त विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा