भारतीय स्टेट बँक ग्रामीण भागातील शेतकरी, शैक्षणिक विद्यार्थी, महिला बचत गट यांना बरोबर घेवून ग्रामविकासाचा नवा आध्याय सुरू करते याचा श्री गणेशा भुईज येथून होत आहे. याचा भुईंज गावासह परिसराने लाभ घ्यावा येत्या काळात हि बॅक प्रत्येकाच्या आर्थिक उत्कर्षांचा कणा ठरेल असा विश्वास स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक रविंद्र हितनंल्ली यांनी केले.
भुईज ता. वाई येथे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात वित्तीय समावेशन शिबीर नुकतेच संपन्न झाले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक रविंद्र हितनंल्ली बोलत होते. यावेळी सह व्यवस्थापक हरिषकुमार राजपाल, विभागीय व्यवस्थापक रणधीरकुमार मिश्रा, सहा. महाप्रबंधक सुधीरकुमार, मुख्य प्रबंधक राजेंद सपकाळे, आरवीओ चे प्रबंधक सचिन गायकवाड भुईजचे शाखा प्रमुख सुहास हेंदे, प्रविण शिंदे, फाळके आदी उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मार्गदर्शक भैय्यासाहेब जाधवराव होते.
स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक रविंद्र हितनंल्ली पुढे बोलताना म्हणाले की स्टेट बॅक आज आपला व्यवसाय करताना स्पर्धेबरोबर चालत समाजभान जपते म्हणूनच ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या शेतकरी वर्ग, शैक्षणिक विद्यार्थी महिला बचत गट यांना प्राध्यान्यक्रमाने अर्थ सहाय्य देत पाठबळ देते. याही पुढील काळात असेच इथल्या शाखेला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करून भुईज शाखेच्या कर्मचारी यांचे कौतुक केले.
यावेळी सह. व्यवस्थापक हरिषकुमार राजपाल, विभागीय व्यवस्थापक रणधीरकुमार मिश्रा, सहा. महाप्रबंधक सुधीरकुमार, मुख्य प्रबंधक राजेंद्र सपकाळे, आरवीओ चे प्रबंधक सचिन गायकवाड भुईंजचे शाखा प्रमुख सुहास हेंद्र, पविण शिंदे, फाळके यांनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षस्थानावरून बोलताना भय्यासाहेव जाधवराव यांनी बँक आणि रयत शिक्षण संस्था नेहमीच समाजाच भल करण्यासाठी दोन पाऊले पुढेच असते असे सांगून बँकेच्या विविध योजनांचे कौतुक केले.
प्रारंभी भुईज शाखेच्यावतीने नवोदित व्यवसायीकांना अर्थ सहाय्याचे धनादेश वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित खातेदार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना बँकेमुळे कोणाची पाल्य परदेशी शिक्षणाला गेली कोणी शेतीतील प्रगत तंत्रज्ञान विकासीत केले. ते अनेक गरजूंनी बँके प्रती ऋण व्यक्त केले.
उपस्थितांचे स्वागत प्राचार्य दीपक ढाणे यांनी केले तर प्रास्ताविक गुरूकुल प्रमुख महेश भोईटे यांनी केले. आभार विजयकुमार नवले यांनी मानले.
भारतीय स्टेट बॅक भुईज येथील आचार्य भृगुऋषी मठ व हायस्कुलसाठी आर्थिक मदत करणार असून लवकरच तो ही कार्यक्रम यशस्वी करू असे मुख्य व्यवस्थापक रविंद्र हितनंल्ली यांनी सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी टाळया वाजवून स्वागत केले.
---------------------

- -------------------

- ------------------------

- -----------------------

- ------------------------

- ------------------------

- -----------------

- -----------------

- ---------------------

- ----------------------------

- गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
-
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा - व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा






