रवी पुजारी या कलाकाराची चित्रपटसृष्टीत भरारी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
शंकर पुजारी व मालन पुजारी यांच्या पोटी जन्माला आलेले रवी पुजारी यांना कोणताही कलेचा वारसा नसताना चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले. त्यांचे शिक्षण भारत विद्यामंदिर वाघोली, या ठिकाणी झाले, या विद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांना कविता करण्याचा छंद होता. हायस्कूलमध्ये असताना त्यांचे गुरुवर्य श्री सुरेश रामचंद्र यादव (एस आर यादव सर) यांनी या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहित केले, वेळोवेळी त्यांच्या कलेला वाव दिला, त्याचा सुंदर परिणाम म्हणजे आज चित्रपट सृष्टी मध्ये रवी पुजारी लेखक, गीतकार आणि कलाकार म्हणून काम करत आहे.
त्यासोबत मेकअप आर्टिस्ट, डान्स कोरिओग्राफर, हि कला त्यांना अवगत आहे. त्यांचे स्वयंभू हे पुस्तक प्रकाशित झाले असून गुरुवर्य हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. का र देवा, कर्तव्यदक्ष पोलीस, मावळा, माझं लगीन, असे चित्रपट, शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, मालिका, या मधूनही त्यांनी काम केले आहे.
त्यांच्या लेखणीतून मावळा माझं लगीन कर्तव्यदक्ष पोलीस स्वयंभू हे त्यांच्या लेखणीतून उतरलेले प्रोजेक्ट आहेत. तसेच हिंदी मध्ये प्रथमच द लास्ट पेंटिंग या शॉर्ट फिल्म मधून प्रथमच आपल्या भेटीस येत आहेत. विठ्ठला वरती असणारे अल्बम साँग लवकरच भेटीस येत आहे. रवींद्र पुजारी लेखक गीतकार कलाकार डान्स कोरिओग्राफर मेकअप आर्टिस्ट प्रत्येक भूमिका ते निभावत आहेत अशा या कलाकारास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














