पोलीस असल्याचे भासवत गुंडांनी रिव्हॉल्वरच्या धाकावर तडजोडनामा लिहून बाघेतला!
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
थंड हवेचे पर्यटनस्थळ पाचगणीतून संतोष शेडगे यांचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला पोलीस असल्याचे भासवत काही अनोळखी इसमांनी गाडी अडवली, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, शिवीगाळ आणि मारहाण केली.
यानंतर पीडित शेडगे यांना मुंबईत नेऊन रात्रीभर कैद करून "वाद मिटवा, नाहीतर जेलमध्ये टाकू" अशी धमकी देत जबरदस्तीने तडजोडनामा लिहून घेण्यात आला.
या प्रकरणी भरत घरतसह चौघांविरोधात अपहरण, मारहाण आणि ब्लॅकमेलचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामागे एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात आणि राज्यभरात खळबळ उडाली आहे.पर्यटनस्थळ असणाऱ्या पाचगणीतच जर दिवसाढवळ्या असे अपहरण होत असेल तर कायद्याचा धाक कुठे राहिला.
औआरोपींना लवकर गजाआड करावे, अशी मागणी आरपीआय A गटाचे संग्राम दादा रोकडे यांनी केली आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा