भाषा, भूषा, भजन, भोजन, भ्रमण, भवन यांचे महत्व पटवून दिले
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्था संचलित सिताबाई थिटे फार्मसी, बापूसाहेब थिटे नर्सिंग कॉलेज व राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त दि १२ ऑगस्ट रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
१२ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी युवकांचे राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान व त्यांच्या पुढील समस्या याबद्दल चर्चा करण्यासाठी हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाच्या संकल्पनेनुसार सुरू झाला.
दरवर्षी हा दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी राहुल भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कुटुंब प्रबोधन प्रमुख शिरूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अखिलेश राजूरकर, संचालक श्री गणेशा हॉस्पिटल शिरूर उपस्थित होते.
राहुल भागवत यांनी आपल्या व्याख्यानातून युवकांना वसुधैव कुटुम्बकम, तसेच स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगत युवकांकडून अपेक्षित असलेले सहा भ म्हणजेच भाषा, भूषा, भजन, भोजन, भ्रमण, भवन यांचे महत्व पटवून दिले
डॉ.अखिलेश राजूरकर यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याची गुरुकिल्ली सांगत शिस्त, परिश्रम, संयम, सातत्य या गोष्टी विद्यार्थी जीवनामध्ये किती महत्त्वाच्या आहेत तसेच या गोष्टींचे पालन केल्यानंतर यश प्राप्ती ही दहा पटीने वाढते हे त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून सांगितले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. अमोल शहा सर, डॉ. सचिन कोठावदे सर, डॉ. शितल बर्डे मॅडम, प्रा. विशाल कारखिले सर व प्रा. विद्या पाचरणे मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विशाल कारखिले यांनी केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे साहेब, सचिव धनंजय थिटे साहेब, संचालक डॉ. हर्षवर्धनजी थिटे साहेब यांनी सर्व प्राचार्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा