पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केली घोषणा
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना सन २०२१ ते २०२४ या कालावधीत गोंदिया या नक्षलग्रस्त भागात केलेल्या सेवेबद्दल विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी २०१० ते २०१३ या कालावधीत गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात केलेल्या कामाबद्दल केंजळे यांना विशेष सेवा पदक मिळाले होते. दुसऱ्यांदा हे विशेष सेवा पदक त्यांना प्राप्त होत आहे.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विशेष सेवा पदक प्राप्त केलेल्या अधिकारी यांची यादी जाहीर केली असून त्यात केंजळे यांचे नाव आहे.
दरम्यान सन२०२४ मध्ये केंजळे यांनी शिरूरचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. शिरूर मध्ये ही काम करताना त्यांनी विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्या धाडसी कामाचे अनेक वेळा जनतेने कौतुक केले आहे
केंजळे हे सन २०१० ते २०१३ या कालावधीत गोंदिया या नक्षलग्रस्त भागातील केशोरी या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांनी जनजागृती बरोबरच तेथील मुलांना पोलीस भरतीसाठी प्रेरित केले या कामाची दखल घेत त्यावेळेस त्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले होते.
पुन्हा सन२०२१ ते २०२४ या कालावधीत गोंदिया या नक्षलग्रस्त भागात केलेल्या सेवेबद्दल विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. दोन वेळा हे पदक मिळाल्याबद्दल आपणास विशेष आनंद झाला असल्याचे केंजळे यांनी सांगितले. काम करत असताना जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पडण्याचा प्रयत्न करत असतो असेही ते म्हणाले.
त्याचप्रमाणे शिरूर पोलीस स्टेशन येथील उपनिरीक्षक नखाते यांनाही नक्षलग्रस्त भागात केलेल्या सेवेबद्दल विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.
दरम्यान शिरूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे पोलीस उपनिरीक्षक नखाते या दोघांनाही एकाच वेळेस विशेष सेवा पदक जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा