वाईच्या पश्चिम भागाच्या निसर्ग सौंदर्याचे लचके तोडू देणार नाही - आंदोलक
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
आज आंदोलनाच्या अठराव्या दिवशी २३० किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत क्रशर विरोधी लॉन्ग मार्च वाशीमध्ये धडकला. जवळपास ६०० - ७०० आंदोलनकर्त्यांचा ताफा वाशीच्या रस्त्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना वाशीमध्ये चक्काजाम झाला. बंद करा बंद करा खडी क्रशर बंद करा या घोषणा देत मुंबई बंगळूर महामार्ग आंदोलनकर्त्यांनी दणाणून सोडला. शेवटच्या टप्प्यात या लॉंग मार्चला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
आज वाईच्या पश्चिम भागातून वाशी या परिसरामध्ये राहणाऱ्या अनेक उद्योजकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलकांची व्यवस्था केली व या लढ्यामध्ये आम्ही शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी आहोत असा शब्द दिला.
वाई तालुक्यातील निसर्ग संपत्ती असणारा वाईचा पश्चिम भाग या भागाच्या कुशीत वसलेली अनेक गाव ही आपल्या निसर्गावर नितांत प्रेम करणारी मंडळी आज आपल्या भागाच्या अस्तित्वासाठी लढत आहे आणि या अस्तित्वाचा लढ्यात श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही लढणार व समोर कितीही मोठी राजकीय शक्ती विरोधात असली तरी आम्हाला फिकीर नाही असा निर्धार आंदोलनकर्त्या महिलांनी त्या ठिकाणी रस्त्यावर केला.
त्यामुळे बुधवारी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या प्रकरणी कोणता निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे त्यावर या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे आंदोलनकर्त्याशिष्ट्य मंडळाकडून सांगण्यात आले.
मागच्या अठरा दिवसापासून वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व कॅबिनेट मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी एकदाही या आंदोलनाची दखल घेतली नसल्याबद्दल मोठ्या स्वरूपात नाराजीचा सूर आंदोलनात दिसून आला.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा