सुनावणी दरम्यान अचानक उपस्थितीने प्रशासनाची धावपळ
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या VC (व्हिडिओ कॉन्फरन्स) मध्ये झालेल्या चर्चेनंतर सातारा जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून सदर समितीचा अहवाल मिळाल्यावर या याप्रकरणी योग्य निर्णय घेणारा अशी माहिती देण्यात आली.
त्या अनुषंगाने आज अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये याप्रकरणी सुनावणी लावण्यात आली. ज्यामध्ये आंदोलनकर्त्यांच्या बाजूने स्वप्निल गायकवाड,डॉ.नितीन सावंत यांनी बाजू मांडली.
२०२२ साली दगड खाणीला परवानगी देताना दाखवण्यात आलेला रस्ता याचे अधिग्रहण २०२४ झाले करण्यात आले या एकाच महत्त्वाच्या मुद्द्यावर सदर प्रकरण हे बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. २०२४ साली या प्रकरणी झालेला फेरफार पाहता त्या मध्ये *लागवड योग्य क्षेत्र* म्हणून अधिग्रहण करण्यात आले आणि या क्षेत्राचा स्वतंत्र ७/१२ तयार करण्यात आला. या फेरफार वर किंवा स्वतंत्र ७/१२ यावर कुठेही रस्ता असा उल्लेख नाही. आणि हे अधिग्रहण २०२४ साली आणि दगड खाण मंजुरी २०२२ ची हे कस शक्य आहे.
बफर झोन बाबत काही महत्त्वाच्या चर्चा झाल्या ज्यात शासन या बफर झोन मध्ये दगड खाण किंवा क्रशरसाठी मान्यता देता येते यावर स्वतःच खाण धारकांचे वकील झाल्यासारखी भूमिका घेतली.
शासनाच्या अनेक चुकीच्या अहवालांना स्वप्निल गायकवाड यांनी आरसा दाखवला डॉ.नितीन सावंत यांनी बफर झोन निगडित मुद्दे मांडले. मात्र शासनाची भूमिका ही प्रचंड संशयास्पद वाटत होती.
मात्र आमदार रोहित दादा पवार यांनी शेवटी मंत्री महोदय यांना सादर करण्यात येणाऱ्या अहवालात कागदाला कागद जोडा अन्यथा कोणाची मर्जी राखण्याच्या नादात तुम्ही स्वतःला अडचणीत आणू नका. मी या आंदोलनातील महिला वृद्ध तरुण यांना शब्द दिला होता जो पर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तो पर्यंत शांत बसणार नाही ही सिंह गर्जना साताऱ्यात येऊन केली.या सुनावणी कामी अशोकराव बापू गायकवाड, प्रदीप माने, विकास शिंदे,रवींद्र आप्पा भिलारे,विराज शिंदे आदी उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा