बौद्धवस्तीमधील समाज मंदिराची सार्वजनिक जागा ही वैयक्तिक हितासाठी लाटण्याचा प्रथत

सरपंचावर तात्काळ निलंबनाची कारवाई

Allegation on sarpanch , wai ,satara , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

धोम ता. वाई येथील बौद्धवस्तीमधील समाज मंदिराची सार्वजनिक जागा ही वैयक्तिक हितासाठी लाटन्याच्या हेतुने गावचा सरपंच कामात खीळ घालत आहे. सरपंचावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी तसेच समाज मंदीराचे काम तात्काळ सुरु करावे, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी समस्थ बौध्दजन महिला व पुरुष मंडळ धोम येथील नियोजीत समाज मंदीराचे ठिकाणी सामुहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन तहसीलदार सोनाली मेटकरी यांना देण्यात आले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, धोम येथील बौध्दवस्तीमध्ये समाज मंदीरासाठी आवश्यक निधी मा.ना. मकरंद आबा पाटील यांजकडुन मंजुर झाला आहे सदर निधीला प्रशासकीय मान्यता दिनांक १५ मार्च २०२४ रोजी मिळाली आहे. तदनंतर मा. कार्यकारी अभियंता (उत्तर) विभाग सातारा जिल्हा परिषद सातारा यांजकडुन नियोजीत समाज मंदीर डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम कार्यारंभ आदेश दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी देणेत आला तदनंतर मा उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वाई, संबंधित कामाचे ठेकेदार ग्रामसेवक धोम व समस्थ बौध्दजन महिला व पुरुष मंडळी धोम व मुंबई यांचे समक्ष आतापर्यंत आठ वेळा लाईन आऊट अंतिम करणेत आली. 

सदर जागेस मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती वाई यांनी नियोजीत जागेस दोन तीन वेळा भेट दिलेली आहे. परंतु असे सर्व असताना धोम गावचा सरपंच सचिन कांबळे हा प्रत्येक वेळी बांधकाम करणेची लाईन आऊट पुर्ण झालेनंतर वेळोवेळी पंचायत समिती बांधकाम विभाग वाई येथे चुकीची माहिती देवून अधिकारी यांना खोटी माहिती सादर करीत आला आहे व त्यामुळेच आजअखेर सदरचे नियोजीत काम थांबवले गेलेले आहे. दिनांक १३ मे २०२५ रोजी सर्वानुमते पुनश्च बांधकाम लाईन आऊट करणेत आली त्यावेळेस मा उपअभियता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वाई संबधित कामाचे ठेकेदार ग्रामसेवक धोम व समस्थ बौध्दजन मंडळ धोम हे उपस्थित होते त्यावेळेस नियोजीत जागेच्या दक्षिण बाजुस ५ फुट जागा व पश्चिम बाजुस ६ फुट जागा सोडून मोजमापे करणेत आली त्यावेळी सदर सरपंच हा देखील उपस्थित होता. 

उपस्थित सर्वांच्या सहयाचा अर्ज पंचायत समिती बांधकाम विभाग यांना देणेत आला होता त्यावेळीही धोम गावचा सरपंच यांने स्वत चे अधिकाराचा गैरवापर करुन दिलेल्या मोजमापे ही कागदांवर खाडाखोड करुन ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर दक्षिण बाजुस ४ फुट व पश्चिम बाजुस १२ फुट तसा खोटा प्रस्ताव पंचायत समिती वाई यांना सादर केला आहे सदर जागा ही सार्वजनिक असुन समाजाचे हितासाठी असताना सदर व्यक्ती हा आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेवुन केवळ त्याचे घरासमोर आंगण म्हणुन वापरणेसाठी त्याचा व त्याचे मुंबई स्थित भाऊ यांचा मानस आहे. 

सदर सरपंच हा वारंवारं खोट्या माहित्या व खोटे अर्ज देवुन प्रशासनाची दिशाभुल व समाजाला वेटीस धरीत आहे. याअगोदर ही गटविकास अधिकारी यांचे दालनात वाई येथे समक्ष बैठक झाली तेव्हा याचेकडे गटविकास अधिकारी यांनी आपणाकडे काही जागेसंबधी पुरावे असतील तर सादर करा त्यावेळी याने स्वताः ची जागा असले बाबत कोणतेही कागदपत्री पुरावे सादर केले नाहीत उलट त्यावेळी मा गटविकास अधिकारी वाई यांना सदर जागा ही समस्थ बौध्दजन मंडळ धोम यांची असले बाबत १९७२ पासुनचे कागदोपत्री पुरावे सदर ठिकाणी उपस्थित असलेले समस्त बौध्दजन मंडळ यांनी सादर केले आहेत. वारंवार हा सरपंच सार्वजनिक कामाबाबत अडथळा निर्माण करतो म्हणून या बाबत कायमचा तोडगा निघावा म्हणुन धोम गावी दिनांक ३० जून २०२५ रोजी याच विषयाबाबत ग्रामसभा आयोजीत करणेत आली होती. त्या सभेस धोम गावातील सुजान नागरीक तसेच आमचे समाजातील सर्व स्त्री पुरुष अबाल वृदध हे उपस्थित होते. 

त्यावेळीही सरपंचाने सभा सुरु होणेपूर्वीच गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय येथे समक्ष जावुन सभेचा कोहरम पूर्ण नसताना ग्रामसेवक यांनी सभा घेतली असल्याची खोटी तक्रार केली त्यावेळेस गटविकास अधिकारी यांनी याबाबतची माहिती घेतली असता, ग्रामसभेस आवश्यक असणारी संख्या पूर्ण झाली असुन ग्रामसभा सुरळीत चालु असल्याचे ग्रामसेवक यांनी दुरध्वनीवरुन सांगीतले. यावेळीही समाजमंदीराचे नियोजीत जागेच्या दक्षिण बाजुस ५ फुट जागा व पश्चिम बाजुस ६ फुट जागा सोडुन बांधकाम करणेत यावे, असा ठराव सर्वानुमते पारीत करणेत आला. त्याप्रमाणे ग्रामसेवक यांनीही तसा प्रस्ताव गटविकास अधिकारी वाई यांना सादर केला आहे. त्याप्रमाणे बांधकाम लाईन आऊट ही अंतिम करणेत आली. परंतु लगेचच दुस-या दिवशी या सरपंचाने लेखी खोटी माहिती ग्रामपंचायतीचे लेटरपॅडवर केवळ एकट्याची सही करुन वाई पंचायत समिती येथे देवुन आणखी कसा अडथळा निर्माण होईल व सार्वजनिक काम कसे थांबेल याबाबत प्रयत्न केला. व ते प्रयत्न आज अखेरही असेच सुरुच ठेवले आहेत. ग्रामसभेस सर्वेच्छ अधिकार गावातील नागरीकांना असताना व त्याप्रमाणे ठराव पारीत होवुन ठराव मा. गटविकास अधिकारी कार्यालय यांना सादर झालेला असताना केवळ आकसापोटी सार्वजनिक जागा ही वैयक्तिक हितासाठी लाटणे हया हेतुसाठी हा धोम गावचा सरपंच या कामात खीळ घालत आहे तरी या सरपंचावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी तसेच समाज मंदीराचे काम तात्काळ सुरु करावे. 

सदरच्या विनंत्या मान्य न झालेस १५ ऑगस्ट रोजी समस्थ बौध्दजन महिला व पुरुष मंडळ धोम येथील नियोजीत समाज मंदीराचे ठिकाणी सामुहिक आत्मदहन करणार आहेत. आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही सबंधीत गावचा सरपंच व ग्राम विकास विभागाची असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !