पिढ्यानपिढ्या सांभाळत आहेत सनई वादनाची परंपरा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पाचवड तालुका वाई येथील स्वरगंधार शहनाई ग्रुपचे केदार हरिभाऊ जाधव यांची थायलंड मधील फुकेट येथील लार्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालयात आषाढी एकादशी ते गणेशोत्सवापर्यंत दररोज सकाळी दुपारी आणि संध्याकाळी सनई चौघडा वादन करण्यासाठी त्याची निवड करण्यात आली.
थायलंड मधील फुकेट येथे भारतीय यांचे आराध्य दैवत असलेले व भारतीय लोकांसाठी लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पाचे भव्य मंदिर बांधले आहे हे मंदिर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती बनवली आहे त्यासाठी त्याची धार्मिक विधी व गणेशोत्सवासाठी अशा दोन महिन्यासाठी त्याची सनई चौघडा वादनासाठी निवड झाली असूनमाझे गुरुजी डॉ. प्रमोद प्रभाशंकर गायकवाड पुणे यांच्या कृपेने मला सनई चौघडा वादन करण्याची संधी मिळाली असल्याचे शिवशाही न्यूज शी बोलताना त्यांनी सांगितले
केदार जाधव चे आजोबा कै. सिताराम जाधव आप्पा हे वाई तालुक्यात सुप्रसिद्ध सनई वादक होते त्यांची परंपरा केदारचे वडील हरिभाऊ जाधव व सर्व जाधव कुटुंबीय ही सनई वादनाची धार्मिक परंपरा गेले कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या सांभाळत आहेत तसेच या धार्मिक वादनासाठी जाधव कुटुंब यांना दोन वेळा परदेशातून वादनाची सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली होतीया निवडीसाठी पाचवड ग्रामपंचायतचे सरपंच महेश गायकवाड तसेच मकरंद पाटील पतसंस्थेचे माजी चेअरमन रविभाऊ जाधव, सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन केले आहे
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा