कराड, दहिवडी, फलटण, सातारा येथील अधिकाऱ्याचा समावेश
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्यातील चार पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) दर्जाच्या अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये कराड, दहिवडी,फलटण, सातारा ग्रामीण येथील अधिकाऱ्याचा समावेश आहे.
डीवाएसपी राजश्री पाटील सांगली तुरची प्रशिक्षण केंद्र येथून कराड येथे बदली झाली आहे. डीवायएसपी विशाल खांबे यांची जालना येथून फलटण येथे बदली झाली आहे.
सातारा जिल्हा पोलिस दलात सध्या सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) दर्जाचे आठ जणांना पदोन्नती मिळून ते पोलिस निरीक्षक होणार आहेत. याबाबतची माहिती गृह विभागाने मागवली असून पुढील आठवड्यात प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये भुईंज पोलिस ठाण्याचे डॅशिंग सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सातारा शहर पोलिस ठाण्यातील शामराव काळे, पोलिस अधीक्षकांचे वाचक रविंद्र तेलतुंबडे, तळबीडचे किरण भोसले, आर्थिक गुन्हेचे राजेंद्र चौधरी, अप्पर पोलिस अधीक्षक यांचे वाचक ज्ञानेश्वर धनवे, औंधचे अविनाश मते, नितीन नम या पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे.
सध्या सातारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्यांमध्ये ८ जणांचा समावेश आहे. पुढील आठवड्यात मध्ये गृह विभागाकडून अधिकृत आदेश निघाल्यानंतर व पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांची राज्यभरात बदली होणार आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा