लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती वाई शहरात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सामाजिक एकतेचा संदेश देत अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिवसेना नेते लोकनेते बापूसाहेब शिंदे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, वाई नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार खामकर, यशवंत नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच मेघा सावंत, झोपडपट्टी सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष सनी भाई ननवरे, सातारा येथील नगरसेवक भारत दादा खामकर, सचिन वायदंडे, संजय सकटे, सुनिल भिसे, करण साठे, राजेंद्र सोनवणे, किशोर भगत, नगरसेवक सतीश वैराट, तसेच वाई पोलीस स्टेशनचे पीएसआय अमोल गवळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. दीपप्रज्वलन बापूसाहेब शिंदे, विराज शिंदे, मेघा सावंत, भारत दादा खामकर, किशोर भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर भाष्य केले. सनी भाई ननवरे यांनी आपलं मत मांडताना सांगितले की, "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी केंद्र सरकारने तत्काळ प्रयत्न करावेत," अशी जोरदार मागणी केली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे: साहित्य, समाजसुधारणा आणि संघर्षाचा प्रेरणास्रोत अण्णाभाऊ साठे (जन्म: १ ऑगस्ट १९२०, वतार, सांगली – निधन: १८ जुलै १९६९) हे मराठीतील एक महान लोकशाहीर, साहित्यिक, समाजसुधारक आणि क्रांतिकारी विचारवंत होते. त्यांच्या साहित्याने दलित, शोषित आणि वंचित वर्गाला आवाज मिळवून दिला.
त्यांनी ललित साहित्य, लोकनाट्य, पोवाडे आणि कथालेखन यामार्फत सामाजिक विषमतेवर प्रहार केला. त्यांची अनेक पुस्तके आजही सामाजिक संघर्षाची प्रेरणा म्हणून वाचली जातात. त्यांनी फड गीते, तमाशा आणि लोकनाट्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत जागृती पोहचवली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे - प्रसिद्ध साहित्य:
"फकीरा" – एक सामाजिक वास्तव दाखवणारी कादंबरी
"वारी पंढरीची", "माझी मैना गावावर राहिली" यांसारखी लोककथानुम सर्जनशील निर्मिती
१२ नाटके, ११ कादंबऱ्या आणि १०० हून अधिक कथा हे त्यांचे लेखन कार्य मोठ्या प्रमाणावर प्रभावी ठरले.
त्यांनी रशियाच्या दौऱ्यावर जाऊन भारतीय कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व केले. रशियन भाषेत त्यांचे साहित्य भाषांतरितही झाले होते, हे त्यांच्या कार्याचे जागतिक महत्व अधोरेखित करते.
कार्यक्रमाची सांगता आणि जनजागृतीचा संदेश
या जयंती सोहळ्यादरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करताना मान्यवरांनी सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्याचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आजच्या पिढीला परिचय करून देणे हे काळाची गरज असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा