गणेश उत्सव पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर पोलीस स्टेशन व सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे यांच्याकडून राबवण्यात आले कोंबिंग ऑपरेशन

25 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक व परिणामकारक कठोर कारवाई

Police combing operation, ganesh utsav, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (जिमाका)

पंढरपुर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वात गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले यामध्ये पंढरपुरात सुरू असलेल्या बेकायदेशीरपणे कोयत्यासह, दहशत पसरविणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक धडक कारवाई करण्यात आली. त्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी धरपकड करून पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे आणून पंढरपुर उपविभागाचे सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांनी ठोस व कडक कारवाई केली.
या कोम्बिींग ऑपरेशन दरम्यान ०२ पिकअप, ०५ मोटारसायकली तसेच २५ सराईत गुन्हेगार यांना पोलीस ठाणे येथे आणुन त्यांचेवर प्रचलित कायदयान्वये कायदेशीर कारवाई करणेत आली आहे.
भविष्यात पंढरपुर शहर व परिसरातील सामान्य लोंकामध्ये कोणीही दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए, तडीपारी यांसारखी कारवाई करून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचा बिमोड करण्यात येईल. आगामी गणेशोत्सव, नवरात्र भक्तीमय, भयमुक्त व शांततापुर्ण वातावरणात पार पडणेसाठी वेळोवेळी अशा प्रकारे ठोस कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बरेच तरूण गुन्हेगार हे इन्स्टाग्राम, युटयुब व सोशल मिडीयांवर गुन्हा व गुन्हेगारी याबाबतचे व्हिडीओ अपलोड करून दहशत पसरवत असल्याने असे प्रकार करू नये असा इशारा देखील दिला.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वात पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनि आशिष कांबळे, सपोनि भारत वाघे, पोसई श्रीकांत घुगरकर, श्रेणी. पोसई राजेश गोसावी, दप्तरी कल्याण ढवणे, पोलीस नाईक सचिन इंगळे तसेच सिरमा गोडसे, सचिन हेंबाडे, प्रसाद औटी, विठठल विभुते, पोकॉ शहाजी मंडले, बजरंग बिचकुले, तसेच पंढरपुर शहर वाहतुक शाखेचे अंमलदार व पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे अंमलदार यांनी कली आहे

---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !