भुईंज जेष्ठ नागरिक संघाचे प्रवक्ते बाळासाहेब उर्फ डॅडी वाघ
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
जरंडेश्वर जेष्ठ नागरिक संघाने पाठीवर हात ठेवून केलेले कौतुक शालेय विद्यार्थी व नवोदित तरूण यांना दिशा देणारे आहेत त्यामुळे जरंडेश्वर देवस्थानच्या व पाडळी सातारारोड या परिसरात नवे वैचारिक व्यासपीठ उभे राहत आहे याचा संपुर्ण जिल्हयाला दीपस्तंभासारखा उपयोग होईल असे प्रतिपादन भुईंज जेष्ठ नागरिक संघाचे प्रवक्ते बाळासाहेब उर्फ डॅडी वाघ यांनी केले.
सातारारोड पाडळी येथे जरंडेश्वर जेष्ठ नागरिक संघ यांनी प्रत्येक मंगळवारी जरंडेश्वर डोंगरावर व पायथ्याला शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना बरोबर घेवून स्वच्छता अभियान राबवण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. याच कार्यक्रमात भुईज जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यांना निमंत्रित केले होते. यावेळी या संघाचे प्रवक्ते बाळासाहेव उर्फ डॅडी वाघ बोलत होते. अध्यक्षस्थानी हणमंतराव फाळके होते.
यावेळी बोलताना डॅडी वाघ पुढे म्हणाले की, एखाद्या गावात गावपण जपण्यासाठी जी समजदार माणसे असतात त्याच धर्तीवर आज जेष्ठ नागरिक संघ हि कर्तव्य बजावतात इथल्या सार्वजनिक क्षेत्रात या जेष्ठ नागरिक संघाने केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असून यापुढे दोन्ही जेष्ठ नागरिक संघ एकत्रित काम करून नवी विधायक चळवळ उभी करतील असे हि ते म्हणाले.
प्रारंभी जरंडेश्वर जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने स्वच्छता अभियान राबवणारे डी. पी. भोसले महाविद्यालय कोरेगाव व अनुरंगाई फाउंडेशन मुंबई यांचा सन्मान प्रशस्ती पत्रक देवून करण्यात आला. यावेळी प्राचार्य आनंदराव गायकवाड, प्रताप चव्हाण, शेखर फाळके, अर्जुन जाधव आदींनी मनोगत व्यक्त केली तर भुईज जेष्ठ नागरिक संघाचे रमेशआबा भोसले, दत्तात्रय भोसले, जगन्नाथ दगडे, दिलीपराव दळवी, अशोकराव चव्हाण आदींनी शुभेच्छा दिल्या.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा