शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यासह पश्चिम भागातील अनेक नागरिक गणेश मूर्ती खरेदीसाठी वाई शहरात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. मात्र वाई शहरात यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मुंबई-पुण्याहून आलेल्या चाकरमान्यांना आणि तालुक्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे अर्धा-अर्धा तास एकाच जागी थांबावे लागत आहे.
वाई शहरात केवळ २ ते ३ ट्रॅफिक पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. अपुरा पोलीस फौजफाटा आणि त्यातही होमगार्ड केवळ नावापुरते उभे राहिल्याने वाहतूक सुरळीत करण्याचे काम केवळ काही निवडक कर्मचाऱ्यांवरच येते. होमगार्डला नागरिक गांभीर्याने घेत नाहीत आणि त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. परिणामी, उलट्या-सुलट्या गाड्या, ट्रिपल सीट दुचाक्या आणि नियम तोडणारे वाहनचालक यामुळे वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे.
या त्रासामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी (एस. पी.) यांनी या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाई शहरात किमान गणेशोत्सव काळात तरी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तातडीने नेमावेत, अशी मागणी केली जात आहे.
तसेच वाई शहरात वाढती गुन्हेगारी, खुलेआम ट्रिपल सीटवर फिरणारे युवक, आणि शालेय वयातील – केवळ १५-१६ वर्षांचे अल्पवयीन – मुलं मोटरसायकल चालवताना दिसणे हे देखील चिंतेचे कारण झाले आहे. पोलिसांच्या डोळ्यांसमोरच हे प्रकार घडत असून देखील कुठलीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास उरलेला नाही.
आशा या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन एस. पी. कार्यालयाने तातडीने रोकडे, ट्रॅफिक पोलीस तसेच वाई पोलीस यांच्यावरील कामाचा तान स्टेशनला आवश्यक त्या संख्येने कर्मचारी दिले जावेत, अशी मागणी वाईकर करत आहेत
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा