हजारो रुपयांच्या रोख बक्षीससह विजेत्या संघास मिळणार आकर्षक 'अजिंक्य' चषक
शिवशाही वृत्तसेवा, सातारा ,(प्रतिनिधी शुभम कोदे)
अजिंक्य उद्योग समूहाचे दूरदृष्टीचे व द्रष्टे नेतृत्व, साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा सह. साखर कारखाना आणि कामगार 'श्री' गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचा आणि त्यांच्यातील ऊर्जा, एकोपा आणि क्रीडाभाव वाढवण्याचा एक अभिनव उपक्रम डोळ्यासमोर ठेवून दि. २९ व ३० ऑगस्ट रोजी साखर कारखाना कार्यस्थळावर भव्य हाफ पीच क्रिकेट,र स्सी खेच व दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा २०२५ चे आयोजन केले असल्याची माहिती कामगार व कल्याण अधिकारी ऍड. रणजित चव्हाण यांनी दिली.
अजिंक्यतारा साखर कारखाना कार्यस्थळावरील स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन परिसरात भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले असून प्रथम क्रमांकाच्या विजयी संघास रक्कम रूपये ७०००/- व 'अजिंक्य' चषक, द्वितीय संघास रक्कम रूपये ५०००/- व 'अजिंक्य' चषक, तृतीय क्रमांकाच्या संघास रक्कम रूपये ३०००/- व 'अजिंक्य' चषक, चतुर्थ क्रमांकाच्या संघास रक्कम रूपये २०००/-'अजिंक्य' चषक देण्यात येणार आहे. मालिका वीर, सामनावीर (अंतिम सामना), सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक, सर्वोत्कृष्ट षटकार, सर्वोत्कृष्ट विकेट, सर्वोत्कृष्ट झेल, आणि सर्वोत्कृष्ट संघ अशी प्रत्येकी ५०० रुपयांची वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
रस्सी खेच स्पर्धा-२०२५
प्रथम क्रमांकाच्या विजयी संघास रक्कम रूपये ५००१/- व 'अजिंक्य' चषक, द्वितीय क्रमांकाच्या विजयी संघास रक्कम रूपये ३००१/- व 'अजिंक्य' चषक,तृतीय क्रमांकाच्या विजयी संघास रक्कम रूपये २००१/- व 'अजिंक्य' चषक, चतुर्थ क्रमांकाच्या विजयी संघास रक्कम रूपये १००१/- व 'अजिंक्य' चषक देण्यात येणार आहे.
दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा-२०२५
प्रथम क्रमांकाच्या विजयी संघास रक्कम रूपये ३०००/- व 'अजिंक्य' चषक, द्वितीय क्रमांकाच्या विजयी संघास रक्कम रूपये २०००/- व 'अजिंक्य' चषक,तृतीय क्रमांकाच्या विजयी संघास रक्कम रूपये १०००/- व 'अजिंक्य' चषक, चतुर्थ क्रमांकाच्या विजयी संघास रक्कम रूपये ५००/- व 'अजिंक्य' चषक, देण्यात येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त यंदा प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचा आनंद सर्व विभागाचे अधिकारी व कामगार यांनी घ्यावा असे आवाहन क्रीडा स्पर्धा नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














