महिलांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिर
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील पश्चिम भागातील वेलंग येथील उंबरजाई गणेशोत्सव मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांसह गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.गुरूवारी सत्यनारायण पुजा व शुक्रवारी महिला माता भगिनींसाठी माधुरी पिसाळ प्रस्तुत “होम मिनिस्टर” स्पर्धा, डॉ. शैलेंद्र धेंडे (वरद ICU) यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर, बालाजी ब्लड बँकच्या मदतीने रक्तदान शिबिर, टायटन आय केअरतर्फे मोफत डोळे तपासणी व डॉ. दामिनी भोसले (भोसले हॉस्पिटल) यांच्यातर्फे महिलांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी व माता भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान मंडळातर्फे करण्यात आले आहे
१९९९ साली स्थापन झालेल्या मंडळाला यंदा २६ वर्षे पूर्ण होत असून, दरवर्षी मंडळात भजन-कीर्तन, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मंडळाची खास बाब म्हणजे गेल्या २६ वर्षांत एकदाही मंडळाला मूर्ती विकत घेतली गेलेली नाही. "नवसाला पावणारा गणपती" म्हणून ओळखले जाणारे हे मंडळ लोकप्रियतेच्या शिखरावर असून, आजही मूर्ती देण्यासाठी चार जण थांबणाऱ्यांच्या यादीत आहेत.व या होम मिनिस्टर खेळा साठी वाई तालुक्यातील दुकानदार व सामाजिक कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
ज्येष्ठांचा मार्गदर्शन लाभलेले हे मंडळ तरुण कार्यकर्त्यांच्या सहभागातून सामाजिक भान जपत समाजोपयोगी कार्य करत आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














