मतिमंद विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर झळकला आनंद
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे)
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या संस्थापिका व आपुलकी मतिमंद शाळेच्या प्राचार्या सुषमा पवार यांच्या पुढाकारातून भुईंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक पतंग पाटील, सुरज शिंदे यांच्या सोबत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. आपुलकी मतिमंद शाळेच्या मतिमंद विद्यार्थिनींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना राख्या बांधून त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला.
यावेळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार शिवाजी तोडरमल, वैभव टकले, चंद्रकांत भोसले,विजय माने,आप्पा कोलवडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, सौ.शामल चव्हाण आदी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक रमेश गर्जे म्हणाले, "या चिमुकल्या बहिणींनी बांधलेली राखी हि केवळ एक धागा नसून, समाजातील प्रत्येक भगिनींच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या स्वरंक्षणाची जबाबदारी आहे. या राख्या आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा देतात." असे सांगून या कार्यक्रमाचे कौतुकही केले. यावेळी आपुलकी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.
"समाजातील इतरा बरोबर रक्षाबंधन सर्व जणच साजरा करतात, मात्र मूकबधीर विध्यार्थीनी सोबत रक्षाबंधन सण साजरा करणे व त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणीत करणे याचे समाधान काही वेगळेच असते", असे प्रतिपादन भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी केले. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडुन वाहत होता
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा