आगळ्यावेगळ्या पद्धतीने केला सातारा जिल्हा प्रशासनाचा निषेध
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
आंदोलनाच्या २५ व्या दिवशी कुसगाव येथील बेकायदेशीर खडी क्रशर विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाने रुद्र रूप घेत थेट मंत्रालयात धडक मारत सातारा जिल्हा प्रशासनाचा निषेध केला.
कुसगाव व परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या बायका मुलांसह २५ दिवसात २५० किमी लाँग मार्च काढत बेकायदेशीर पद्धतीने मान्यता देऊन सुरू करण्यात आलेला क्रशर बंद करण्यासाठी मुंबई मंत्रालयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
जिल्हा प्रशासनाने दबावाखाली विरोधात दिलेल्या अहवालाची चीड ग्रामस्थांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी थेट मंत्रालयात जाऊन सातारा जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला. मंत्रालयाच्या आवारात पोचलेल्या ग्रामस्थांना पोलिसांनी आडवून मंत्रालयात जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्या ठिकाणी ग्रामस्थ व पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सर्व ग्रामस्थांना घेरून पोलिसांनी अडवून ठेवले. हे सुरू असताना ग्रामस्थांची दुसरी एक तुकडी मंत्रालयाच्या आवारात प्रमुख प्रवेश द्वारा जवळ पोचली व त्यांनी सातारा जिल्हा प्रशासनाच्या निषेधाचे टीशर्ट घालत साखळी करून घोषणा देत जिल्हा प्रशासनाचा आगळा वेगळा निषेध केला. तसेच स्थानिक लोक प्रतिनिधींचा देखील निषेध नोंदवला.
त्यानंतर संबंधित आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले. त्यामुळे येत्या काळात एका दगड खाणीला व क्रशरला वाचवण्यासाठी प्रशासन अजून किती दबाव टाकणार आणि शेतकरी राजाला आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा