चार कॅबिनेट मंत्री आणि दोन खासदार असूनही ग्रह खात्याचे दुर्लक्ष
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पश्चिम भागात व वाई तालुक्यात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाढते गुन्हेगारी मोटार केबल चोरी प्रमाण लक्षात घेता, सध्याची पोलीस कर्मचारी संख्या अत्यंत अपुरी ठरत आहे. परिणामी तपास यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला असून, वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वाई एमआयडीसी ही तालुक्याची आर्थिक वाहिनी मानली जाते, मात्र त्या ठिकाणी असणारी पोलीस चौकी ही कमी मनुष्यबळाच्या कारणाने रिकामीच आहे या दक्षिणकाशी वाई नावाने जगभरात ओळख असलेल्या वाई नगरीत पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा अभाव जाणवतो. त्यामुळे अनेक ठिकाणी घरफोड्या, चोरीसारखे गुन्हे घडत असून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय या भागात काम करत असतात अपुऱ्या पोलीस यंत्रणेमुळे त्यांचे पोलीस पाडताळणी सुद्धा करता येत नाही एवढी मोठी गंभीर बाब आहे व तपास प्रलंबित राहत आहेत. पोलीस यंत्रणेतील कमकुवतपणा आणि कर्मचारी अपुऱ्या असल्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांविषयीचे ‘भय’ राहिलेला नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
चार मंत्री, दोन खासदार असूनही गृहखात्याचे मंत्री या क्रांतिकारकांच्या सैनिकी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्याला न्याय द्यायचं काम करतील का?
जिल्ह्यात सध्या चार कॅबिनेट मंत्री आणि दोन खासदार कार्यरत आहेत. तरीही गृह खात्याच्या दुर्लक्षामुळे पोलीस व्यवस्था ढिसाळ होत चालल्याची टीका नागरिक करत आहेत. महाबळेश्वर-पाचगणी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असून, दरवर्षी येथे लाखो पर्यटक भेट देतात. धोम धरण परिसर, वाढते हॉटेल व्यवसाय येणारे पर्यटक तसेच वाईचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरात देश-विदेशातून पर्यटक गर्दी करतात. मात्र, त्या प्रमाणात वाहतूक आणि सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यात आलेली नाही.
वाहतूक आणि सुरक्षेवर ताण
ट्राफिक समस्येमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. पोलीस कर्मचारी कमी वाढलेली लोकसंख्या आणि वाहने जास्त असल्यामुळे दक्षिणकाशी वाई या ठिकाणी प्रभावी नियंत्रण राहिलेलं नाही. मंत्री व मान्यवर सातत्याने या भागात भेटी देतात. त्यासाठी अतिरिक्त बंदोबस्ताची गरज असते. मात्र त्यांच्याकडेच अपूरे कर्मचारी असल्याकारणाने सध्याची पोलीस यंत्रणा ती गरजही पूर्ण करू शकत नाही.
कोयना सुरक्षेवर 28 पोलिस स्टेशनचे कर्मचारी स्थानिक यंत्रणांवर ताण
जिल्हा पोलीस दलातील व तब्बल 28 पोलीस स्टेशनचे कर्मचारी कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात. यामुळे स्थानिक ठिकाणी तैनात असणाऱ्या पोलीस स्टेशनवर ताण आणखी वाढतो. विशेषतः मल्हारपेठ आणि मसूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी या बंदोबस्तात नसल्याची दबक्या आवाजातील चर्चा पोलीस खात्यात सुरू आहे. परिणामी स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे अधिक कठीण झाले आहे.
नागरिकांची मागणी
पोलीस फौज फाटा वाढवावा गृह विभागाने याची तात्काळ दखल घेऊन वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि पर्यटनस्थळांची सुरक्षितता सक्षम करण्यासाठी पोलीस यंत्रणेला मनुष्यबळ, वाहने आणि आधुनिक साधनसामग्री तातडीने पुरवण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा