मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी केला खुलासा
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना श्रींच्या विविध प्रकारच्या पुजा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामध्ये श्रींच्या तुळशीपुजेचा समावेश आहे. सदर पुजा बुकींगसाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून, ही पुजा देशभरातील भाविक घरबसल्या बुकींग करून पुजेसाठी येत असतात. या भाविकांना पुजेची माहिती व्हावी व पुजेच्या अनुषंगाने सुचना देण्यासाठी प्राधान्याने मराठी व आवश्यक भासल्यास हिंदी भाषेतूनही माहिती / सुचना देण्यात येतात. मात्र, पुजेचे मंत्र हे मराठी व संस्कृत भाषेतून पठण करण्यात येते. यामध्ये पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही.
सदरच्या तुळशी पुजेवेळी श्री संत तुकाराम भवन येथे आचमन करून व संकल्प करण्यात येतो. त्यानंतर श्री गणपतीचे स्मरण, श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे स्मरण व विष्णूसस्त्रनाम पठण करून पुजा करण्यात येते. यासाठी मराठी व संस्कृत भाषेचा वापर करण्यात येतो. तथापि, पुजे संबंधी माहिती सर्व भाविकांना व्हावी या उद्देशाने प्राधान्याने मराठी व आवश्यकता भासल्यास हिंदी व इतर भाषेतून माहिती देण्यात येते.
श्री राहूल सातपुते या भाविकांने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधितांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा