सातारा 'Tv 9 प्रतिनिधी दिनकर थोरात यांना मातृशोक
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
वारुंजी ता. कराड ज्येष्ठ पत्रकार आणि टीव्ही ९ चे प्रतिनिधी दिनकर थोरात यांच्या मातोश्री श्रीमती मंगल बाळासाहेब थोरात (वय ६७) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने थोरात कुटुंबावर आणि वारुंजी गावावर शोककळा पसरली आहे.
मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी थोरात कुटुंबीयांचे सांत्वन केले.
वारुंजी येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि सुना असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज सकाळी ९ वाजता वारुंजी येथील स्मशानभूमीत करण्यात आले. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या दुःखद प्रसंगी थोरात कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














