तहसीलदार बाळासाहेब मस्के यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
गणेशोत्सव २०२५ निमित्त प्रशासनाच्या वतीने गणेश मंडळाचे कार्यकर्ते , शांतता समितीचे सदस्य व पोलीस पाटील यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
गणेश मंडळानी गणोशोत्सव काळात स्वंयशिस्तीचे पालन करुन तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी भर द्यावा व हा उत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले.
सार्वजनिक गणेशोत्सव२०२५ च्या निमित्ताने शिरूर शहर व परिसरातील गणेश मंडळ अध्यक्ष व कार्यकर्त्यांची, शांतता समितीचे सदस्य यांची बैठक शिरूर तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, मुख्याध्याधिकारी प्रीतम पाटील जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर ,प्रा चंद्रकांत धापटे ,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव , शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य जयवंत साळुंखे, ॲड .बाबुराव पाचंगे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, समस्त सकल मराठा समाज शिरूरचे विश्वस्त सागर नरवडे, अविनाश जाधव, राणी कर्डीले, आरपीआयचे शहराध्यक्ष नीलेश जाधव, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बापू सानप, पोलीस पाटील संदिप भोगावडे , सागर सातारकर, आदित्य मेनसे, सोहेल शेख, मिनीनाथ काळे, श्रेयस काळे, आतिष नेवासकर, शरद पवार, अजय मोहोळकर, संतोष अभंग रोहन जामदार, देवा हिंगडे, कौस्तुभ जामदार , मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे, सविता बोरुडे, आदी उपस्थित होते.
तहसिलदार म्हस्के म्हणाले की गणेश मंडळाच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले . प्रत्येक गणेश मंडळ यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा. विसर्जन मार्गावर लाईटच्या तारा जास्त प्रमाणात खाली असतील त्या एमईएसबीने तातडीने व्यवस्थित कराव्यात. या कामाबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. गणेश मंडळानी स्वंयशिस्त बाळगावी. मंडळाच्या कार्यकर्त्यानी उत्सव काळात स्वंत:ची नियमावली करावी . समाजात आदर्श निर्माण होणारा व प्रबोधनात्मक देखावा सादर करावा . ग्णेशोत्सव काळात रस्त्याला अडथळे होईल अशी अतिक्रमणे होणार नाहीत याबाबत पालिकेने दक्षता घ्यावी.
गणेशोत्सव संदर्भात नियमाची अंमलबजावनी न करणा-या गणेश मंडळावर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी बैठकीत दिला.
ते म्हणाले गणेश मंडळाच्या मंडपाच्या रहदारीस, रस्त्यास अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी .आवाज व लेझर बाबत सर्वोच्च न्यायलयांचा निर्दशानुसारच सूचनांची अंमलबजावणी करावी. शासनाने गणेशोत्सवास राज्य उत्सव म्हणून जाहीर केले आहे. प्रशासन हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी सहकार्य करेल. विसर्जन मिरवणूक दरम्यान गणेश मंडळानी एका चौकात किती वेळ थांबायचे हे ठरवून घ्याव. प्रत्येक गणेश मंडळ यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. विसर्जन मिरवणूकीत पारंपारिक वाद्याचा वापर करावा.
मुख्याधिकारी प्रीतम पाटील म्हणाले की विसर्जन मिरवणूक रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येईल व स्वच्छता ही ठेवण्यात येईल. गणेश मंडळानी प्रबोधनात्मक कार्यक्रमा बरोबरच पर्यावरणपूरक गणेशोत्सव करावा. असे आवाहन करण्यात आले. बैठकीस मोठ्या संख्येने गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














