डॉ.विठ्ठल भोईटे यांचा मोलाचा वाटा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय हे सामान्य जनतेसाठी डॉ. विठ्ठल भोईटे यांच्यामुळे एक विश्वासाचे ठिकाण ठरत आहे विशेषतः मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या बाबतीत, हे रुग्णालय पश्चिम भागातील व ग्रामीण भागातील वाई तालुक्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. विठ्ठल भोईटे हे सेवानिवृत्तीनंतरही अत्यंत समर्पिततेने मोतीबिंदू रुग्णांना नवी दृष्टी देण्यासाठी कार्यरत आहेत.
गेल्या आठवड्यात वाई ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून तब्बल २१ मोतीबिंदू रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सांगली येथील नंदादीप रुग्णालयात फेको टेक्नॉलॉजीसारख्या आधुनिक प्रणालीद्वारे ही शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मोफत करण्यात आली.
रुग्णांच्या संपूर्ण तपासण्या डोळ्यांची चाचणी, मधुमेह, रक्तदाब व इतर आवश्यक तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जातात. शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांना वाईहून सांगली आणि परत वाई येथे ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची मोफत सोय केली जाते. रुग्णांना किंवा त्याच्या नातेवाईकांना कोणताही प्रवास किंवा जेवणाचा खर्च करावा लागत नाही.
वाई परिसरात मोतीबिंदूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. यामध्ये निराधार रुग्णांची संख्या लक्षणीय असून, त्यांच्यासाठी डॉ. भोईटे आणि ग्रामीण रुग्णालय "देवदूत" ठरत आहेत. दर महिन्याला सरासरी १०० पेक्षा अधिक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते.
शस्त्रक्रियेनंतरही रुग्णांची आवश्यक काळजी घेतली जाते. त्यामुळेच वाई ग्रामीण रुग्णालय हे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची पहिली पसंती ठरले आहे, असे मत अनेक रुग्णांनी व्यक्त केले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा