महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसुलमंत्री, जिल्हाधिकारी तहसिलदार यांना शिवपाणंद चळवळीकडून पत्र
सध्या महाराष्ट्र मध्ये शेत व शिव रस्ता संबंधी खूप मोठ्या प्रमाणावर सुविधा असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे ज्याप्रमाणे मानवाला अन्न वस्त्र व निवारा याची नितांत आवश्यकता असते त्याचप्रमाणे अन्न निर्माण करण्यासाठी शेती उपयोगात आणणे आवश्यक आहे या शेतीसाठी पाणी विद्युत पुरवठा व खतपुरवठा व यंत्रसामुग्री व बी बियाणे इत्यादींच्या आवश्यकता असते शेती कशासाठी शेतीची अवजारे शेतामध्ये नेणे आणणे आवश्यक आहे त्यासाठी सुस्थितीतला रस्ता असणे आवश्यक आहे. शहरी भागामध्ये एकमेकांना जोडलेले शहरे ही समृद्धी हायवे मोठमोठाले राज्य मार्ग याद्वारे कायमस्वरूपी पक्क्या स्वरूपात रस्ते जोडले गेलेले आहेत त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे
राज्यातील ग्रामपंचायतींनाही विशेष ठराव करण्याचे अवाहन
ग्रामीण भागाचा कायापालट करायचा असेल तर त्यासाठी चांगल्या स्थितीतले रस्ते असणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे शहरी भागासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग काम करतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागासाठी शेत व शिव पानंद रस्ता समृद्धी करण्यासाठी एक विशेष शेत व शिवार रस्ता महामंडळ महाराष्ट्र सरकारने स्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींनी एक विशेष नाम प्रथा घेऊन त्यामध्ये शेत व शिव पाणंद रस्ते विकास महामंडळ करण्याची मागणी करणारा ठराव घेऊन तो मंजूर करून घ्यावा. त्यामुळे हे महामंडळ स्थापन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करता येईल. गावागावातील शेतकऱ्यांमध्ये असणारे वाद संपुष्टात येवून शेतकऱ्यांना प्रगती साधता येईल. शेत येथे रस्ता आणि गाव तिथे समृद्धी या ब्रीदवाक्याची अंमलबजावणी करता येईल.
या महामंडळाची स्थापना करताना त्यामध्ये ज्या व्यक्तीला स्वतःची शेती आहे किमान पाच एकर शेती असावी त्याला त्याच्या शेतीतला रस्ता बिकट कसा होता आणि आहे याची जाणीव असावी तोच या महामंडळाचा वापर व्यवस्थित करू शकेल
या महामंडळ अंतर्गत ग्रामीण भागातील दोन गावांमधील असलेला शिव रस्ता हा किमान 33 फूट रुंदीचा असतो ब्रिटिश काळामध्ये 1830 च्या दरम्यान सर्व शिवरस्ते हे नंबरी लावून मोजून घेतलेली होते आता भारताला स्वातंत्र्य मिळूनही एकदाही शिवरस्ते मोजलेले नाहीत त्यामुळे त्यावर अतिक्रमण झालेले आहे सदर अतिक्रमण हे आपल्याच भागातील शेतकऱ्यांनी केलेले आहे परंतु त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे व यंत्रणातच कमी असल्यामुळे यासाठी स्वतंत्र शेत व शिव पाणंद शेतरस्ता महामंडळ स्थापन करणे गरजेचे आहे या महामंडळामार्फत प्रथमतः शेत रस्ते शिवरस्ते व शिवपानंद रस्ते हे पूर्णतः आरक्षित करून घ्यावेत यावर महाराष्ट्र शासनाचा अंमल असावा अंमल म्हणजे ताबा असावा आणि त्यासंबंधीची देखरेख ही पीडब्ल्यूडी सारखी या महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे एक्झिक्युटी इंजिनिअर त्यावरील असणारे कामगार बिगारी कामगार यांनी त्याची देखभाल करावयाची आहे.
त्यासाठी आवश्यक असलेला निधी महाराष्ट्र शासनाने महसूल मधून किंवा इतर कर रूपाने जमा होणारा पैसा या महामंडळाकडे वर्ग करून त्यातून शेत व शिवर असते व शिवपानंद रस्ते खडीकरणयुक्त डांबरीकरण युक्त व सिमेंट काँक्रीट करणे युक्त करावीत जेणेकरून शेतकऱ्याला शेतीमध्ये शेती करण्यासाठी लागणारी अवजारे ट्रॅक्टर हार्वेस्टर जेसीबी तसेच उत्पादित पिके बाहेर आणण्यासाठी बाजारपेठेत पोहोच करण्यासाठी या रस्त्याने जाता येईल व लवकरात लवकर सेवा मिळेल
सध्या शेत रस्ता संबंधी महसूल व वन विभाग हे सातत्याने शासन निर्णय काढत आहेत त्याची जबाबदारी तालुक्याच्या तहसीलदारांकडे आहे परंतु तहसीलदारांचे काही अधिकार सीमित आहेत त्यातून योग्य तो मार्ग निघाला जात नाही पर्यायाने शेतकरी एकमेकात भांडण तंटे वाद विवाद कोर्टकचेऱ्या इत्यादीमध्ये त्यांचा वेळ वाहतो पैसा खर्च होतो व असणारी माणुसकी संपुष्टात येते
हे सर्व करण्यासाठी शेत असता संबंधीचा सर्व कारभार हा स्वतंत्र महामंडळामार्फत केल्यास त्यामध्ये फारसा वेळ न जाता सर्व शेतकऱ्यांना पक्क्या स्वरूपाची रस्ते उपलब्ध होतील अशी आशा आहे
महामंडळाची कर्तव्य खालील प्रमाणे असावी
प्रथम प्रत्येक गावांमधील आवश्यक असणारे शिव रस्ते सखोल मोजणी करून त्याला प्रमाणे त्यांची मोजमापे आरक्षित करणे म्हणजे दोन गावांमधील शिव रस्ता 33 फुटाचा निश्चित करावा
गावातील पूर्वी असलेले नकाशावर गाव नकाशा वरील रस्ते हे किमान 16 फुटाचे असावेत असा नियम करावा ते अतिक्रमण मुक्त करण्यात यावे
- खाजगी क्षेत्रासाठी प्रत्येक शेतीला शेत रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे
- प्रत्येकाच्या सातबारे उताऱ्यावर त्याची नोंद असावी त्याचा हक्क इतर हक्कात क्षेत्र संबंधित असावा
- शेत रस्ते हे पक्क्या स्वरूपात करण्यात यावीत
- शेत रस्त्याचा संबंधित कायमस्वरूपी देखभाल ची यंत्रणा असावी
- शेत रस्त्यासाठी स्वतंत्र निधी स्थापन करण्यात यावा
अशा विविध मागण्या शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी सरकारकडे केल्या आहेत.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा