लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून केली कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या धडाकेबाज कारवाईत सार्वजनिक बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता प्रशांत आनंदा बावधनकर वय (45) आणि खासगी कंत्राटदार शिवाजी बहु जाधव वय (27) यांना २४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती लाज लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिली. बुधवारी २० ऑगस्ट २०२५ रोजी ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील एका नोंदणीकृत कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीनुसार, त्यांना मिळालेल्या रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी कनिष्ठ अभियंता प्रशांत बावधनकर यांनी पैशांची मागणी केली होती. बावधनकर यांनी क्वालिटी कंट्रोल रिपोर्टसाठी ४,००० रुपये आणि कामाच्या एकूण रकमेच्या ५ टक्के म्हणजेच २०,००० रुपये, अशी एकूण २४,००० रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणात खासगी कंत्राटदार शिवाजी जाधव याने मध्यस्थी करत लाच घेण्यास प्रोत्साहन दिले.
त्यानंतर एसीबीने सापळा रचून प्रशांत बावधनकर याला त्याच्या कार्यालयात पंचांसमोर लाच घेताना पकडले. याप्रकरणी बावधनकर आणि जाधव यांच्याविरुद्ध कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक श्रीमती सुप्रीया गावडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
लाचखोरीबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी एसीबीच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














