संतप्त ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
पावसाळ्याचे दिवस आले की ग्रामीण भागामध्ये घाणीचे साम्राज्य पसरते. डासांचा उपद्रव, विंचू, साप, गोम, याचा धुमाकूळ सुरू होतो. यामुळे खेड्यांतील लोकांना जगणे मुश्किल होऊ लागते. कोणत्याही कार्यालयाचा कारभार जर पारदर्शक राहिला तर लोकांच्या समस्या निर्माण होत नाहीत. मात्र नायगाव विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना याची जाण कधी येईल हा खरा प्रश्न आहे.
नरसी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुखेड रस्त्यावरील होटाळा गावात एक महिन्यापासून लाईट बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावात पाणी पुरवठा व्यवस्था बंद पडली आहे. गावातील आरोग्य उपकेंद्रात रुग्णांवर लाईट शिवाय उपचार करण्याची वेळ आली असून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नायगाव विज वितरण कंपनीचे उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. गावातील वीज पुरवठा ताबडतोब सुरळीत करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर दत्ता आनंद बन, बालाजी पवार, देवराव पवार, गंगाराम पवार, भगवान बन, जेजेराव, रावण पवार, आनंद पवार, विठ्ठल पवार, गंगाराम पवार, आनंद गंगाराम पवार, नागोराव इंगळे, परशुराम पवार, रंजीत पवार, राजेश बन, गणेश पवार, आनंद ताटे, गजानन पवार, सुरेश पवार, सुरेश बालाजी पवार, यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














